Catagories

ताज पे साज

ताज पे साज

पान no. 11 वर महाराजश्री शिव शंकरालाच मन नियंत्रित करण्यास बोलावतात कारण  मन हे नियंत्रणासाठी अतिशय दुष्कर आहे असे लिहिले आहे. श्री ज्ञानराज महाराजांच्याही एका पदात प्रभू तुम्हारे पद कमल पर मन सदा एकाग्र हो मध्ये ते माणिक प्रभूंना प्रार्थना करतात की माझे मन एकाग्र होऊ दे. माणिकप्रभु उत्तरादाखल अप्रतिम मौक्तिक देतात. म्हणतात, मन स्थिर झाले तर ते मन कुठले? ते तर आत्मरुप झाले.

read more
प्रसाद

प्रसाद

५०० कि.मी. हुन अधिक अंतर गाडी चालली होती. प्राथमिक अंदाजानुसार बॅटरी व सेल्फ सुरूवात होत नसल्याचे कारण पहायचे होते. मी गाडीतून खाली उतरलो. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास खुणेनेच सांगितले. तेवढ्यात एक दुचाकी समोर येऊन थांबली. त्यावर दोन गृहस्थ होते. त्यांनी विचारपूस केली, व त्यांच्यापैकी एक गाडी मागे गेला. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास सांगू लागला. तर दुस-या व्यक्तीने मला गाडीचे बॉनेट उघडण्यास सांगितले व गाडी तपासली. बॅटरी कनेक्टर सैल झाले होते ते तात्पुरते ठीक करून दिले. व आम्हाला सांगितले की तात्पुरते काम केले आहे,

read more
तू चुकु नको आत्मा रामा

तू चुकु नको आत्मा रामा

नौबतखान्यात मध्यरात्रीची नौबत व शहनाई वाजत होती. श्री मार्तंड प्रभूंनी शहनाई वाजविणान्यास बोलावून घेतले व विचारले ‘‘तू कुठलं गाणं वाजवीत होतास ?’’ शहनाईवाला घाबरून गेला व म्हणाला – ‘‘महाराज, कालच तुळजापूरचे काही गोंधळी आले होते, त्यांच्या तोंडून मी ही धून ऐकली, मला आवडली, म्हणून मी वाजवली.’’ महाराज म्हणाले – ‘‘असतील तेथून त्या गोंधळ्यांस बोलावून घेऊन ये.’’

read more
आमचा राजा

आमचा राजा

हे शब्द ऐकताच व्यंकटराव ओशाळला. काय उत्तर द्यावे हेच त्याला समजेना. ‘‘महाराज, मुले लहान आहेत…’’ वगैरे सबबी तो सांगू लागला. त्याचे उत्तर ऐकून महाराजांना हसू आवरेना. ते पाहून हणमंतराव म्हणाला ‘‘महाराज, मी आपल्या बरोबर येण्यास तयार आहे. आपण मला घेऊन चला.’’ महाराजांची चर्या गंभीर झाली. काही तरी विचार करून ते म्हणाले, ‘‘तुला मी घेऊन गेलो असतो रे हणमंत, पण मुद्दाम येथे ठेवून जात आहे. माझ्या मनात बरीच कार्य करावयाची होती. ती पुरी झाली नाहीत.

read more
प्रभु प्रसादाची महिमा

प्रभु प्रसादाची महिमा

माणिकनगरला श्रीजींपुढे आल्याबरोबर ‘काय झालं रे अनिल?’ म्हणून श्रीजींनी पूर्ण वृत्तांत माझ्याकडून ऐकलं. पुढचा प्रवास सुखरूप व्हावा या साठी आम्ही जेव्हां श्रीजींना पुन्हा प्रसाद विचारलं तेव्हां ते म्हणाले ‘‘दिलो कि रे प्रसाद सकाळीच. त्या प्रसादामुळेच सगळे वाचले, आणखी दुसरा प्रसाद कशाला?’’ प्रसाद होता म्हणूनच सर्वजण वाचले – श्रीजींचे हे उद्गार ऐकताच अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘योगक्षेमं वहामि अहम्‌’ परमेश्वराच्या या वचनाचे स्मरण झाले. आम्ही भक्त कितीही गाफिल असलो तरी अमचा तो सद्गुरु सतत आमच्या योगक्षेमाची चिंता वाहत असतो यात मुळीच शंका नही.

read more
श्रीमाणिकप्रभु बाललीला

श्रीमाणिकप्रभु बाललीला

सायंकाळी कोणी एक वैश्यवाणी । व्यंकप्पा नामे आला कल्याणी । सत्य झाली माणिकप्रभुंची वाणी । पुत्रप्राप्ती म्हणोनि ॥७॥

read more