शून्याची निर्मिती ही आर्यभट्ट यांनी केली हे सर्वश्रुत आहे. शून्याचं महत्व गणितात खूप आहे. संख्येच्या (number) आधी असेल तर value म्हणजे महत्व नसतं पण तोच शून्य जर संख्येच्या पुढे असेल तर त्याचं महत्व 10 पटीने वाढतं! म्हणजे जागा महत्वाची! शून्याचं महत्व केवळ तो जेव्हा संख्येच्या पुढे असतो तेव्हाच आहे. आणि जितके शून्य अधिक तितकी त्या संख्येची value अधिक. शून्यतत्व ना पुढे ना मागे. त्या स्तिथीत राहणे. ध्यानस्थ!

मार्तंड माणिकप्रभूमहाराज महामौन शतक मध्ये म्हणतात जरी वृत्ती ही त्या स्थळी शून्यभावी महाशून्य हे नाम कल्पोनी ठेवी.  शून्य म्हणजे पूर्णत्व. कोणताही विचार न येणं, ध्यानस्थ होणं, मी पणा जाणं त्या परमात्म्यात विलीन होणं!

शून्य म्हणजे रितं होणं. प्रभुंकडे येतांना पाटी कोरी ठेवावी लागते. रितं व्हावं लागतं. कशाने? तर भौतिक आशा,आकांशा, इच्छा याच्या त्याग करून. पण म्हणून काय काहीच करावं नाही का ! तर अस नाही. तर मनाने आपण त्या स्थितीला पोहचणे. श्रीजींनी सांगितले आहेच ‘माणसामध्ये जो पर्यंत अहंकार आहे तो पर्यंत जीव प्रभूच्या शोधात असतो आणि जेव्हा अहंकार नष्ट होतो (शड्रिपू नाहीसे होणं) तेव्हा स्वतः प्रभूच त्या जीवाला भेटण्यासाठी आतुर असतो ,स्वतःच दोन पावलं पुढे येतो’ . थोडक्यात मनाची शुद्धी , चित्त शुद्धी होणे आणि ती केवळ आणि केवळ सतत प्रभूस्मरणाने आणि गुरुकृपेमुळेच हूं शकते.

प्रभूंची ज्यांच्या ज्यांच्यावर विशेष कृपा झाली त्यांना त्यांना प्रभूंनी कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा आधी त्याग करायला सांगितला कोणाला दागिन्यांचा , पैश्यांचा , षड्रिपूंचा ! म्हणजेच त्यांना शून्य अवस्थेत आणलं , पाटी कोरी करायला सांगितली आणि त्यानंतर त्यांच्यावर नुसता कृपेचा वर्षाव झालेला आपण प्रभू चरित्रात पाहतोच. कारण जीवाने परमात्म्यात लिन व्हायला एकरूप होणं जरुरी असतं . कशाची आडकाठी असेल तर हे कसे होणार आणि तो परमानंद तरी कसा मिळणार !

श्रीजींनी ज्ञानलहरी मध्ये एका कवितेत म्हंटले आहे . ‘प्रभुने मेरा सब कूछ छीना’ ..जड असणाऱ्या गोष्टी प्रभू आपल्याकडून जेव्हा काढून घेतात तेव्हा उरत काय तर . ‘इतना ही है अब करने को ..माणिक माणिक प्यालें को अब चुस्की ले ले पिना!
अध्यात्म म्हणजे समुद्रा सारखे अथांग आणि खोल आहे . जितके खोल शिराल (स्वस्वरूपाला / तत्वाला जाणून घेण्यासाठी ) तितकी ज्ञानरुपी मोती मिळण्याची शक्यता अधिक. इथे आतील खरे पणाला अत्यंत महत्व आहे. वर वर कितीही दिखावा केला तरी त्याला काडीचीही किंमत नाही. ज्याला प्रपंचाची भूक असते तो खाय खाय करणारच पण गुरुकृपेमुळे पारमार्थिक ओढ लागून मन शांत होते. व्यवहारिक जगात अनेक विचार येत असतात पण सुषुप्तीत विचारांची balancesheet शुन्य होते. या अवस्थेत मात्र प्रचंड शक्ती आहे . शून्यात म्हणजे व्यापकता. शून्य स्थितीत पोहचणे म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यात्माकडे सुरवात होणे .

आए थे हम प्रभू के द्वार
मन में ढेर सारी मांग लिए ,
प्रभू कि कृपा ऐसीं हुई कि..
मांग का नामोनिशान ना रहा |

[social_warfare]