Catagories

श्रीप्रभुमनोहराख्यान

श्रीप्रभुमनोहराख्यान

श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता । नृसिंहतात्या नामे विख्याता । विठाबाई पत्नी पतीव्रता । तात्या महाराजांची ॥१॥ नाईक घराण्याची वंशवेल । नृसिंहतात्याच आता फुलवेल । दत्तप्रसाद लवकरच भेटेल । आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥ होते कालयुक्ति नाम सवंत्सर । श्रावण अमावास्या दिवस...

read more
माझ्या मनीची तृष्णा

माझ्या मनीची तृष्णा

माझ्या मनीची तृष्णा शमविशील का रे कृष्णा श्वासही घेतला उसना तुझ्याकडूनच ।। तुझ्याकडूनच सर्व येते अंती तुझ्यातच सामावते परी येते मीपणाचे भरते अहंकारामुळे ।। अहंकारामुळे कंस गेला शिशुपालही तैसाच वधिला काम क्रोधे कोण वाचिला, त्रिभुवनांत ।। त्रिभुवनांत तुझा संचार प्रेमाची...

read more
सगरोळी दौरा करडखेड वृत्तांत (भाग नववा)

सगरोळी दौरा करडखेड वृत्तांत (भाग नववा)

श्री. माणिकराव कुलकर्ण्यांच्या वडिलांनी म्हणजेच गुरुदासांनी, श्री सिद्धराज प्रभुंचा उपदेश १९६५ साली घेतला होता आणि त्यांनी गादीची मनोभावे सेवा चालू ठेवली होती. पण सन २००० साली ते फार उद्विग्न झाले. त्यांच्या मनात सारखे यायचे की, मार्तंड माणिकप्रभु येऊन गेल्यानं

read more
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग आठवा)

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग आठवा)

सव्वा सहाच्या सुमारास आम्ही देगलूरला श्री. मेढेवार सावकार यांच्या घरी पोहोचलो. येथेही अतिशय उत्साहात श्रीजींचे स्वागत व तद्नंतर श्रद्धेने पाद्यपूजा झाली. सावकारांच्या घरानंतर श्री. राजकुंटवारे यांच्याही घरी श्रीजींची पाद्यपूजा झाली. देगलूर मधील ह्या दोन पाद्यपूजा आटोपून आम्ही करडखेडला रवाना झालो. वातावरण ढगाळ असले तरी पावसाने अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती घेतली होती. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही करडखेडला पोहोचलो. गावाच्या वेशीवरच हाती दिवट्या घेऊन, संबळ वाजवीत गावकरी श्रीजींच्या स्वागतासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

read more
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सातवा)

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सातवा)

श्री. चंद्रकांत शक्कवारांकडून श्रीजींचा ताफा आता सावकार श्री. गंगाधर शक्करवार यांच्या गृही आला होता. येथे भक्तांची प्रचंड गर्दी होती. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून, वरच्या माळ्यावरील श्रीजींच्या पाद्यपूजेच्या स्थळापर्यंत, संपूर्ण मार्गावर गुलाबदलांच्या पायघड्या घातल्या होत्या. श्रीजींचे आगमन होताच फटाक्यांची एकच आतिषबाजी झाली. वरच्या मजल्यावरून सुमारे दहा मिनिटं गुलाबदलांची अखंड उधळण श्रीजींवर आणि प्रभुभक्तांवर होत होती. श्रीजींच्या पाद्यपूजेनंतर सुमारे दोन-तीनशे जणांनी श्रीप्रभुपादुकांचे दर्शन आणि श्रीजींचा आशीर्वाद घेतला. आलेल्या सर्व भक्तांसाठी आजही श्री. गंगाधर सावकारांनी महाप्रसादाची सोय केली होती. श्रीगुरु आपल्या घरी प्रत्यक्ष आले आहेत, हा दिवस प्रत्येक भक्तासाठी उत्सवापेक्षा काही कमी नसतो. माझे सारे वैभव हे केवळ आणि केवळ श्रीगुरु कृपेनेच आहे आणि हा कल्पवृक्ष

read more