ठाणे व्याख्यानावर भक्तजनांची प्रतिक्रिया
ठाणे नगरीच्या पाचपाखाडी येथील श्री ज्ञानेश्र्वर मंदिर मध्ये निवृत्तिनाथ सभागृहात १७ ते २१ मे दर्म्यान श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांनी गीतेच्या सोळाव्या अध्यायावर केलेल्या प्रवचनावर सद्भक्तांकडून आलेली काही प्रतिक्रिया…
श्रीजींच्या प्रवचनावर श्रोत्यांची प्रतिक्रिया
गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या प्रत्येक श्लोकाविषयी सविस्तरपणे समजावून सांगण्यात महाराजांचा हातखंडा होता याबद्दल माहिती होती. यापूर्वी दोन दिवसांत महाराजांनी सोळाव्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकांबद्दल भक्तांना सविस्तरपणे समजावून सांगितले होतेच; त्यामध्ये दैवी संपत्ती (गुण) विषयी विवेचन केलेले होते. आज पुढील चार ते सात श्लोकांविषयी महाराजांनी सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यामध्ये आसुरी संपत्तीचा उल्लेख होता. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, अज्ञान अशा सामान्य माणसांच्या अंगी असलेल्या आसुरी गुणांविषयी महाराजांनी साध्या सोप्या भाषेत विवेचन केले, इतकेच नव्हे तर दंभ, दर्प, अभिमान यांचा अर्थ अहंकार जरी असला तरी त्यामधला फरकही महाराजांनी खूप सुंदर रित्या समजावून सांगितला. शिवाय जीवनातील छोट्या छोट्या घटना, प्रसंगांचा दाखला देत अधूनमधून हसतखेळत सुसंवाद साधत गीतेतील अध्यायांत गुंगवून टाकले. अर्थात मलासुद्धा महाराजांनी त्यांच्या या दोन तासांच्या प्रवचनात खिळवून ठेवले एव्हढे मात्र निश्चित! श्री विजयकुमार पवार, ठाणे
वेदांत सप्ताह भाग सहावा
आज पुन्हा श्रीजींच्या घरी नित्यपूजेचा आनंद घेतला. माध्यान्हपूजेचे तीर्थ मिळणे हा ही आपल्या भाग्याचा क्षण. श्रीप्रभु कृपेने हे क्षण माणिकनगरातील वास्तव्यात अनेकदा येतात. कधीकधी आपल्यालाच आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. पूजेनंतर श्रीजींनी दहा मिनीटांत प्रवचनाला येतो म्हणून सांगितले.
वेदांत सप्ताह भाग पाचवा
आज श्रीप्रभुचरित्र वाचताना खूपदा डोळ्यांच्या कडा अलगद ओलावल्या. पारायणकाळात दर दिवसागणिक श्रीप्रभुशी आपली नाळ इतकी घट्ट होत जाते की आपण त्या त्या कथानकात आपण प्रत्यक्ष शिरकाव करतो आणि श्रीप्रभुंच्या लीला वाचताना, त्यांची करुणामयता, परोपकारी वृत्ती आणि भक्तवत्सलता अनुभवताना आपसूकच कंठ दाटून येतो. असो, श्रीप्रभुच्या आनंदलहरी अनुभवत आजचे पारायण पूर्ण केले. श्रीप्रभु दर्शनासाठी मंदिरात आलो. श्रीप्रभु आज अत्यंत शोभिवंत दिसत होता. गडद लाल रंगाच्या समाधीवरील वस्त्रावर, सोनेरी नक्षीकाम असलेली शेंदरी रंगाची रेशमी शाल अत्यंत मोहक दिसत होती. नवरत्नांची, सोन्याच्या, रुद्राक्षांच्या, मोत्यांच्या अनेकविध माळा घालून हा नटनागर आज नटला होता. कागडा आणि अबोलीच्या सुंदर माळा गळाभर रुळत होत्या. नागकेशर, गुलाब, शेवंती आणि फुग्यांच्या फुलांची नेत्रदीपक सजावट, श्रीप्रभभुसौंदर्यात आणखीनच भर घालत होती. श्रीप्रभु समाधीवरील चांदीचे छत्र अबोलीच्या माळांमुळे अत्यंत आकर्षक दिसत होतं. कदाचित माझ्या अंतरंगातील भावनांचे प्रतिबिंबच श्रीप्रभुच्या समाधीवर उमटले होते. श्रीप्रभु मंदिराला प्रदक्षिणा घालून यात्री निवासावर आलो. पाद्यपूजेचे सामान ठेवून श्रीजींच्या घरी आलो.
वेदांत सप्ताह भाग चौथा
संध्याकाळचा महाप्रसाद घेऊन श्रीप्रभुमंदिरात भजनासाठी येऊन बसलो. आजचा रंग लाल होता. देवीलाही कुंकवाचा लाल रंग अती प्रिय आहे. मंगळवारचे भजन, हे देवी भजन आहे. श्रीजींच्या आगमनाआधी गावकऱ्यांचे भजन नित्यक्रम होता. आजची तरुण पिढी भजनामध्ये दंग होत असलेलं हे चित्र खूपच आश्वासक आहे. श्रीजींच्या पारंपरिक आगमनानंतर आज प्रवचनासाठी लाग लाग सख्या गुरु पायी.. हे श्रीमाणिक प्रभुंचच पद होते. आजचे निरूपणही सुमारे तासभर चालले. श्रीजींना सततच्या ऐकण्याच्या सवयीमुळे अध्यात्मातील संकल्पना हळूहळू समजायला लागल्यात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सुसंगत उत्तरे अंतरातून यायला सुरुवात झाली आहे. मनाचीआणि बुद्धीची एकवाक्यता होत होती. श्रीजींच्या प्रवचनानंतर, गणराज पायी मन जड जड जड… हे श्रीमाणिकप्रभु विरचित पद ऐकणे म्हणजे कानांसाठी ए
वेदांत सप्ताह भाग तिसरा
आरतीनंतर पुन्हा शेजारतीचे पद गादीपाशी येऊन म्हटले गेले. सर्वांच्या कपाळी भस्म लावून खोबरे कुरमुऱ्याचा प्रसाद वाटला गेला. आजही रात्री भजनासाठीच्या मंडळाच्या प्रमुखाला शाल देऊन आशीर्वाद देण्यात आला. भजनानंतर कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा पद उच्चारवात आनंदमंटपात सर्वांमुखी गुंजू लागले. ह्या पदाच्या गजरात श्रीजी आपल्या निवासस्थानी परतू लागतात. आजही घड्याळाचा काटा मध्यरात्र उलटून गेल्याचे दाखवत होता. अखंड वीणा श्रीमाणिकनाम झंकारत होती आणि भोळासांब श्रीप्रभु गाभाऱ्यातून घरी परतणाऱ्या भक्तांकडे कृपादृष्टीने पाहत होता…
Recent Comments