जब तलक मैं था
एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.
श्रीप्रभुमनोहराख्यान
श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता । नृसिंहतात्या नामे विख्याता । विठाबाई पत्नी पतीव्रता । तात्या महाराजांची ॥१॥ नाईक घराण्याची वंशवेल । नृसिंहतात्याच आता फुलवेल । दत्तप्रसाद लवकरच भेटेल । आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥ होते कालयुक्ति नाम सवंत्सर । श्रावण अमावास्या दिवस...
माझ्या मनीची तृष्णा
माझ्या मनीची तृष्णा शमविशील का रे कृष्णा श्वासही घेतला उसना तुझ्याकडूनच ।। तुझ्याकडूनच सर्व येते अंती तुझ्यातच सामावते परी येते मीपणाचे भरते अहंकारामुळे ।। अहंकारामुळे कंस गेला शिशुपालही तैसाच वधिला काम क्रोधे कोण वाचिला, त्रिभुवनांत ।। त्रिभुवनांत तुझा संचार प्रेमाची...
प्रभुपाठ
प्रभु नका देवु मज अहंकार | मागणे चरणावर हेचि एक || ६४ ||
सगरोळी दौरा करडखेड वृत्तांत (भाग नववा)
श्री. माणिकराव कुलकर्ण्यांच्या वडिलांनी म्हणजेच गुरुदासांनी, श्री सिद्धराज प्रभुंचा उपदेश १९६५ साली घेतला होता आणि त्यांनी गादीची मनोभावे सेवा चालू ठेवली होती. पण सन २००० साली ते फार उद्विग्न झाले. त्यांच्या मनात सारखे यायचे की, मार्तंड माणिकप्रभु येऊन गेल्यानं
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग आठवा)
सव्वा सहाच्या सुमारास आम्ही देगलूरला श्री. मेढेवार सावकार यांच्या घरी पोहोचलो. येथेही अतिशय उत्साहात श्रीजींचे स्वागत व तद्नंतर श्रद्धेने पाद्यपूजा झाली. सावकारांच्या घरानंतर श्री. राजकुंटवारे यांच्याही घरी श्रीजींची पाद्यपूजा झाली. देगलूर मधील ह्या दोन पाद्यपूजा आटोपून आम्ही करडखेडला रवाना झालो. वातावरण ढगाळ असले तरी पावसाने अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती घेतली होती. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही करडखेडला पोहोचलो. गावाच्या वेशीवरच हाती दिवट्या घेऊन, संबळ वाजवीत गावकरी श्रीजींच्या स्वागतासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.






Recent Comments