सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सहावा)
सुखापासून सुरू झालेला हा प्रवास हा अनेक नागमोडी वळणे घेऊन, ईश्वराच्या अधिष्ठानापर्यंत येऊन म्हणजेच अथांग ज्ञानसागरापर्यंत येऊन पोहोचला होता. सर्व प्रभुभक्तांना एकाच नावेमध्ये बसवून श्री ज्ञानराज प्रभुरुपी कुशल नावाड्याने, ज्ञानाच्या ह्या खळखळ वाहणाऱ्या नदीतून, वेदांतसागरापर्यंत सर्वांना सुखरूप आणून पोहोचवले होते. प्रवचनाच्या शेवटी अवधूत चिंतनाचा गजर होताच उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाटाने श्रीप्रभु मंदिराचे सभागृह भरून राहिले होते.
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग पाचवा)
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने उसंत घेतली. श्रीगुरुंच्या शब्दांबाहेर जायचे धारिष्ट्य कदाचित त्याच्यातही नसावे. पाऊस थांबल्यामुळे गावकऱ्यांतही उत्साहाचे वातावरण होते. त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. संध्याकाळी सव्वासहा वाजता आम्ही अतिथीगृहातून, शोभायात्रेचा प्रारंभ जेथून होणार होता, त्या विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ पोहोचलो. जवळपास संपूर्ण सगरोळी गाव येथे जमला होता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच लगबग चालू होती. श्रीजींच्या स्वागतासाठी संस्कारभारतीच्या भल्या मोठ्या आकर्षक रांगोळ्या मंदिर परिसरात काढल्या होत्या. शोभायात्रेसा
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग चौथा)
दुपारी तीनच्या सुमारास आम्ही सर्व पुन्हा शारदानगर येथील अतिथीगृहात आलो. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे श्रीजींना थोडीशी सर्दीची बाधा झाली होती. पाद्यपूजेच्या वेळेस मात्र सगरोळी गावामध्ये फिरताना पावसाने विश्रांती घेतली होती. एखाद-दुसऱ्या ठिकाणी मंद मंद सरी बरसल्या, पण त्याने कोणताही प्रभुभक्त भिजला नाही. अतिथीगृहावर देशमुखदादा श्रीजींना म्हणाले, महाराज संध्याकाळी शोभायात्रा आहे. तेव्हा श्रीजी म्हणाले, अहो इतका पाऊस पडतो आहे कशाला शोभायात्रा काढता? आपण प्रभुमंदिरात थेट प्रवचनाला जाऊया! यावर उपस्थितांपैकी
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग तिसरा)
बापूसाहेबांचे नारायणराव आणि गोविंदराव असे दोन पुत्र. उभयतांचा तुळजापुरात जाण्याचा वार्षिक नेम होता. पुढे तुळजापूरच्या भवानीने सांगितले की, तू आता थकला आहेस, याकरिता तू येऊ नकोस, मीच तुझ्याबरोबर तुझ्याकडे येते. मात्र, तू मागे पाहू नकोस! जर मागे पाहिले तर मी त्याच ठिकाणी राहीन! देशमु
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग दुसरा)
वातावरण ढगाळ होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या बारीक सरी, मनास प्रफुल्लित करत होत्या. संध्याकाळी सुमारे सहाच्या दरम्यान आम्ही देगलूरला श्री. राजेश्वर देशपांडे यांच्या घरी पाद्यपूजेसाठी पोहोचलो. श्रीजींच्या आगमनाने देशपांडे कुटुंबात लगबग चालू झाली. श्रीजींची पाद्यपूजा झाल्यावर दारामध्ये पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली. सौ. रमा देशपांडेकाकूंनी सर्वांसाठी मुगडाळीची भजी केली होती. त्या गरमागरम नाश्त्याची चव जिभेवर रेंगाळत असतानाच, आम्ही श्री. पुरुषोत्तम देशपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथेही श्रीजींची पाद्यपूजा झाली. श्री. मार्तंड माणिक प्रभु आपल्या कार्यकाळात सगरोळी दौऱ्याहून माणिकनगरला येताना श्री. पुरुषोत्तमकाकांच्या घरी तीन दिवस राहिले होते. त्या जुन्या आठवणींना येथे उजाळा मिळाला. त्यानंतर आणखीन एक प्रभुभक्त श्री. अरुण शेळकीकर ह्यांच्याकडे श्रीजींची
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग पहिला)
त्यांच्यावरील संकट दूर करून, सकलमत संप्रदायाचे तत्त्वज्ञान त्यांच्यात रुजवून, त्यांना भक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्रीजींनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या अनेक अनेक ठिकाणी केलेल्या दौऱ्यांच्या माध्यमातून केले. अशा ह्या दौऱ्याची सुरुवात इसवी सन १९०० साली झाली. ह्याच वर्षी माणिकनगरमध्ये पहिला वेदांत सप्ताह पार पडला. महाराजश्रींचा पहिला दौरा गुलबर्गा, रायचूर, नारायण पेठ असा झाला. त्याकाळी श्रीजींचे दौरे महिनोंमहिने चालत. दौऱ्याची ही परंपरा त्यानंतरच्या सर्वच पीठाचार्यांनी आजतागायत सुरू ठेवली आहे.
Recent Comments