गुरु हाचि माय बाप

 

देह हा धारण
केला ज्या कारण
गुरु आता त्यास्तव केला पाहिजे

भगवंत प्राप्ती
हीच ती आसक्ती
होणे नसे शक्य गुरुवीण

गुरु हाचि माय बाप
गुरुच परब्रह्म
गुरु हे तत्व, व्यापले सर्वत्र

गुरूला नसे कोणते बंधन
देहा पलिकडले ते स्पंदनं
सेवेतून अनुभवावे परमानंदन

गुरुमुळेच पुढची वाट
मुमुक्षूस दिसे या जन्मात
धरिले एकदा का बोट गुरूंचे

नेटवर्क मध्ये येणे

एकदा द माणिक पब्लिक स्कूल मधील मुलांचे श्रीजीं सोबत ‘संवाद’ या कार्यक्रमात प्रश्न-उत्तर session सुरू होते. ‘एकच परमात्मा सगळ्यांनमध्ये कसा असू शकतो’ या प्रश्नाचे उत्तर देतांना श्रीजींनी मुलांना समजेल असं मोबाईलचं उदाहरण दिलं की जरी सगळ्यांकडे device व sim वेगवेगळे असो पण नेटवर्क एकच आहे . ते दिसत नसले तरी फोन सुरू असणे हे त्याचे proof आहे. तसेच परमात्म्याचे आहे… भलेही अनेक रूपे असोत पण तत्व एकच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये त्या एकच परमात्म्याचा अंश आहे…किती समर्पक उत्तर आणि मुलांना समजेल असं सोप्या भाषेत श्रीजींनी सांगितले . यातील गाभार्थ मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे . जसं कोणाशी आपण फोन वर बोलत असू आणि जर त्याला आपला आवाज पोहचत नसेल तर समोरची व्यक्ति काय म्हणते ? नेटवर्क मध्ये ये आणि मग आपण जरा घरच्या बाहेर जाऊन किंवा खिडकी जवळ येऊन बोलू लागतो म्हणजे संपर्क कक्षेत यतो…आणि मग समोरच्याला आपला आवाज नीट ऐकू येतो . दूसरं महत्वाचं की कोणतं सिमकार्ड आहे आणि कोणता G आहे ! 4G, 5 G.. आपलं शरीर म्हणजे आपलं device , आपलं मन आणि बुद्धी म्हणजे सिमकार्ड आणि आत्मा म्हणजे नेटवर्क असं आपण समजूया. जेव्हा तीनही गोष्टी aligned असतील तेव्हा प्रभूकृपारूपी संभाषण झालंच म्हणून समजा ! आता खरी गंमत अशी आहे की ‘प्रभूंच्या नेटवर्क’ मध्ये जर यायचे असेल तर खऱ्या अर्थाने जगाशी ‘disconnect’ व्हावे लागेल (आध्यात्मिक) , out of coverage area म्हणजेच संपर्क क्षेत्राच्या बाहेर जावे लागेल (भौतिक जगाशी) . थोडक्यात प्रभूंची अनुभूति घ्यायला आपल्याला आपल्या आत शिरावे लागेल तरच आपल्याला प्रभू कळतील ! आणि एकदा का ‘प्रभूंच्या नेटवर्क’ मध्ये आपण आलो की ‘प्रभूंना धरणे माहीत आहे सोडणे नाही’ याची अनुभूति आल्याशिवाय रहात नाही.
आता मुख्य मुद्दा हा आहे की प्रभूंच्या नेटवर्क मध्ये येणे म्हणजे काय आणि ते कसं ? तर…. ‘माणिक हा भावाचा भुकेला आणिक न लगे काय’ बस एवढं कळलं म्हणजे एक पायरी आपण चढलो ! भक्तीचे जसे नऊ प्रकार आहेत तसेच काही टप्पे पण आहेत. जस जसे आपण ते गाठू तस तसे आपण अधिक प्रभूंच्या जवळ येऊ …..प्रभुकृपे साठी पात्र होऊ . ज्ञानमार्ग , भक्तिमार्ग आणि योगमार्ग जस ज्याला शक्य तसे त्याने करावे. आपल्या पाच ज्ञानेंद्रिय च्या माध्यमातूनही आपण प्रभूंची भक्ति करू शकतो ; डोळ्यात प्रभूंचेच रूप साठवणे , जास्तीतजास्त प्रभूंविषयीचे ऐकणे. बोलताना प्रभूंविषयीचे बोलणे, आपल्या प्रत्येक श्वासात प्रभूनाम घेणे आणि शाररिक रूपाने जेवढी होईल तेवढी सेवा करणे. भक्तीचा महिमा असा आहे की ज्ञानाच्या अहंकारला देखील मागे टाकतो. परमोच्च आनंद कशाला म्हणतात , समर्पण म्हणजे काय , प्रेम कसं करतात , देहभान विसरणे म्हणजे काय , एवढ कशाला तर स्वत:ला विसरणे म्हणजे काय हे देखील आपल्याला भक्ति मुळेच कळू शकतं. आणि प्रभूकृपे मुळेच हे हू शकतं हे वेगळं सांगायला नको ! एकदा का आपण प्रभूंच्या नेटवर्क मध्ये आलो की आपली पुढची सगळी काळजी मिटलीच म्हणून समजा. प्रभू हे सर्व इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षा प्रमाणे आहेत. आपल्या मनातलं सगळं कळतं त्यांना. योग्य वाट दाखवणारेही तेच आणि काही चुकल्यावर सांभाळून घेणारेही तेच.

सुंदर मुखकमल ,बघताच डोळे दिपती
तेजस्वी मूर्ती ती
तो असे प्रभू हा….प्रभू हा…. प्रभू हा

सगळ्यात असूनही कोणातही नसे
आर्त हाक देताक्षणि मात्र धावून येई
तो असे प्रभू हा….प्रभू हा….प्रभू हा

एकदा धरले जे आपले बोट
न सोडे कदापि
‘सगळ्यातून’ अलगत बाहेर काढे
तो असे प्रभू हा….प्रभू हा….प्रभू हा

प्रभूंनि सांगितले आहेच…
‘धरियले गे माय श्रीगुरुचे पाय |
मी पण जेथे समूळ गेले तूपण कैचे काय’ ||

प्रभूंच्या नेटवर्क मध्ये आलो तर समजून जा जन्माचं सार्थक झालं .