Catagories

सगरोळी दौरा करडखेड वृत्तांत (भाग नववा)

सगरोळी दौरा करडखेड वृत्तांत (भाग नववा)

श्री. माणिकराव कुलकर्ण्यांच्या वडिलांनी म्हणजेच गुरुदासांनी, श्री सिद्धराज प्रभुंचा उपदेश १९६५ साली घेतला होता आणि त्यांनी गादीची मनोभावे सेवा चालू ठेवली होती. पण सन २००० साली ते फार उद्विग्न झाले. त्यांच्या मनात सारखे यायचे की, मार्तंड माणिकप्रभु येऊन गेल्यानं

read more
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग आठवा)

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग आठवा)

सव्वा सहाच्या सुमारास आम्ही देगलूरला श्री. मेढेवार सावकार यांच्या घरी पोहोचलो. येथेही अतिशय उत्साहात श्रीजींचे स्वागत व तद्नंतर श्रद्धेने पाद्यपूजा झाली. सावकारांच्या घरानंतर श्री. राजकुंटवारे यांच्याही घरी श्रीजींची पाद्यपूजा झाली. देगलूर मधील ह्या दोन पाद्यपूजा आटोपून आम्ही करडखेडला रवाना झालो. वातावरण ढगाळ असले तरी पावसाने अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती घेतली होती. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही करडखेडला पोहोचलो. गावाच्या वेशीवरच हाती दिवट्या घेऊन, संबळ वाजवीत गावकरी श्रीजींच्या स्वागतासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

read more
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सातवा)

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सातवा)

श्री. चंद्रकांत शक्कवारांकडून श्रीजींचा ताफा आता सावकार श्री. गंगाधर शक्करवार यांच्या गृही आला होता. येथे भक्तांची प्रचंड गर्दी होती. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून, वरच्या माळ्यावरील श्रीजींच्या पाद्यपूजेच्या स्थळापर्यंत, संपूर्ण मार्गावर गुलाबदलांच्या पायघड्या घातल्या होत्या. श्रीजींचे आगमन होताच फटाक्यांची एकच आतिषबाजी झाली. वरच्या मजल्यावरून सुमारे दहा मिनिटं गुलाबदलांची अखंड उधळण श्रीजींवर आणि प्रभुभक्तांवर होत होती. श्रीजींच्या पाद्यपूजेनंतर सुमारे दोन-तीनशे जणांनी श्रीप्रभुपादुकांचे दर्शन आणि श्रीजींचा आशीर्वाद घेतला. आलेल्या सर्व भक्तांसाठी आजही श्री. गंगाधर सावकारांनी महाप्रसादाची सोय केली होती. श्रीगुरु आपल्या घरी प्रत्यक्ष आले आहेत, हा दिवस प्रत्येक भक्तासाठी उत्सवापेक्षा काही कमी नसतो. माझे सारे वैभव हे केवळ आणि केवळ श्रीगुरु कृपेनेच आहे आणि हा कल्पवृक्ष

read more
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सहावा)

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सहावा)

सुखापासून सुरू झालेला हा प्रवास हा अनेक नागमोडी वळणे घेऊन, ईश्वराच्या अधिष्ठानापर्यंत येऊन म्हणजेच अथांग ज्ञानसागरापर्यंत येऊन पोहोचला होता. सर्व प्रभुभक्तांना एकाच नावेमध्ये बसवून श्री ज्ञानराज प्रभुरुपी कुशल नावाड्याने, ज्ञानाच्या ह्या खळखळ वाहणाऱ्या नदीतून, वेदांतसागरापर्यंत सर्वांना सुखरूप आणून पोहोचवले होते. प्रवचनाच्या शेवटी अवधूत चिंतनाचा गजर होताच उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाटाने श्रीप्रभु मंदिराचे सभागृह भरून राहिले होते.

read more
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग पाचवा)

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग पाचवा)

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने उसंत घेतली. श्रीगुरुंच्या शब्दांबाहेर जायचे धारिष्ट्य कदाचित त्याच्यातही नसावे. पाऊस थांबल्यामुळे गावकऱ्यांतही उत्साहाचे वातावरण होते. त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. संध्याकाळी सव्वासहा वाजता आम्ही अतिथीगृहातून, शोभायात्रेचा प्रारंभ जेथून होणार होता, त्या विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ पोहोचलो. जवळपास संपूर्ण सगरोळी गाव येथे जमला होता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच लगबग चालू होती. श्रीजींच्या स्वागतासाठी संस्कारभारतीच्या भल्या मोठ्या आकर्षक रांगोळ्या मंदिर परिसरात काढल्या होत्या. शोभायात्रेसा

read more
सगरोळी दौरा वृत्तांत (भाग चौथा)

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग चौथा)

दुपारी तीनच्या सुमारास आम्ही सर्व पुन्हा शारदानगर येथील अतिथीगृहात आलो.‌ सततच्या पडणाऱ्या पावसामुळे श्रीजींना थोडीशी सर्दीची बाधा झाली होती. पाद्यपूजेच्या वेळेस मात्र सगरोळी गावामध्ये फिरताना पावसाने विश्रांती घेतली होती. एखाद-दुसऱ्या ठिकाणी मंद मंद सरी बरसल्या, पण त्याने कोणताही प्रभुभक्त भिजला नाही. अतिथीगृहावर देशमुखदादा श्रीजींना म्हणाले, महाराज संध्याकाळी शोभायात्रा आहे. तेव्हा श्रीजी म्हणाले, अहो इतका पाऊस पडतो आहे कशाला शोभायात्रा काढता? आपण प्रभुमंदिरात थेट प्रवचनाला जाऊया! यावर उपस्थितांपैकी

read more