वेदांत सप्ताह भाग चौथा
संध्याकाळचा महाप्रसाद घेऊन श्रीप्रभुमंदिरात भजनासाठी येऊन बसलो. आजचा रंग लाल होता. देवीलाही कुंकवाचा लाल रंग अती प्रिय आहे. मंगळवारचे भजन, हे देवी भजन आहे. श्रीजींच्या आगमनाआधी गावकऱ्यांचे भजन नित्यक्रम होता. आजची तरुण पिढी भजनामध्ये दंग होत असलेलं हे चित्र खूपच आश्वासक आहे. श्रीजींच्या पारंपरिक आगमनानंतर आज प्रवचनासाठी लाग लाग सख्या गुरु पायी.. हे श्रीमाणिक प्रभुंचच पद होते. आजचे निरूपणही सुमारे तासभर चालले. श्रीजींना सततच्या ऐकण्याच्या सवयीमुळे अध्यात्मातील संकल्पना हळूहळू समजायला लागल्यात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सुसंगत उत्तरे अंतरातून यायला सुरुवात झाली आहे. मनाचीआणि बुद्धीची एकवाक्यता होत होती. श्रीजींच्या प्रवचनानंतर, गणराज पायी मन जड जड जड… हे श्रीमाणिकप्रभु विरचित पद ऐकणे म्हणजे कानांसाठी ए
वेदांत सप्ताह भाग तिसरा
आरतीनंतर पुन्हा शेजारतीचे पद गादीपाशी येऊन म्हटले गेले. सर्वांच्या कपाळी भस्म लावून खोबरे कुरमुऱ्याचा प्रसाद वाटला गेला. आजही रात्री भजनासाठीच्या मंडळाच्या प्रमुखाला शाल देऊन आशीर्वाद देण्यात आला. भजनानंतर कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा पद उच्चारवात आनंदमंटपात सर्वांमुखी गुंजू लागले. ह्या पदाच्या गजरात श्रीजी आपल्या निवासस्थानी परतू लागतात. आजही घड्याळाचा काटा मध्यरात्र उलटून गेल्याचे दाखवत होता. अखंड वीणा श्रीमाणिकनाम झंकारत होती आणि भोळासांब श्रीप्रभु गाभाऱ्यातून घरी परतणाऱ्या भक्तांकडे कृपादृष्टीने पाहत होता…
वेदांत सप्ताह भाग दुसरा
भंडारखान्याच्या बाजूला असलेल्या श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवचनाआधी सर्वांना एक ग्लास थंडगार मसाला ताक देण्यात आले. स्त्रियांना व पुरुषांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, मधोमध श्रीजींचे व्यासपीठ, पाठीमागे श्रीमाणिकनगर संस्थानाचा श्रीप्रभु मंदिराच्या कळसाचे चित्र असलेला सुंदर फलक मन वेधून घेत होता. वातानुकूलित हॉल, बाहेरच्या दुपारच्या गरमीपासून शरीरास छान थंड करत होता. सर्वांना एक-एक वही आणि पेन देण्यात आला. ध्वनी व्यवस्थाही अद्ययावत होती. गीतेच्या सतराव्या अध्यायाची एक एक प्रतही सर्वांना दिली गेली. सर्व आयोजनामध्ये एक विशिष्ट प्रकारची सुसूत्रता होती. येणाऱ्या सर्व आस्तिक महाजनांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी श्री संस्थानाने घेतली होती.
वेदांत सप्ताह भाग पहिला
एव्हाना खोलीतले इतरजणही आले होते. कोल्हापूरचे साधले, कुलकर्णी, सांगलीचे कुलकर्णी आणि पुण्याचे पेटकरकाका अश्या ज्येष्ठांचा सहवास लाभला. दुपारी थोडासा आराम केला. चारच्या सुमारास चहा आला. सर्व जण चहाला जमले. अनेकजण महाराष्ट्रातील विविध भागांतून वेदांत सप्ताहासाठी आलेले. बरेचसे मागच्या पारायणाच्या आठवणींना उजाळा देत होते. प्रत्येकाचे वेगवेगळे कथाकथन गरमागरम चहाची घोटागणीक लज्जत वाढवत होता. दोन कप चहा घेतला. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. माझ्यासारखा एखाददुसरा पहिल्यांदाच सहभागी होत होता. सकलमत संप्रदायात कुठलाही भेदभाव नाही, ह्याचा पदोपदी अनुभव आपल्याला श्री माणिकनगरात येतो. जय गुरु माणिक हे तीन शब्द एकमेकांना प्रभुप्रेमाच्या एकाच माळेत सहजपणे गुंफतात.
दास्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण
महाराज म्हणतात की सगूण भक्तिची ही पायरी ओलांडून आपण निर्गुण उपासनेच्या पायरीवर पोहोचायला हवे, जिथे “देवा भक्ता मुळी भेदचि नाही” हा प्रत्यय आपल्याला.
प्रभुंच्या कृपेने, आणि श्री महाराजांच्या शुभाशीर्वादाने आपल्याला सर्वांना हा प्रत्यय लवकरच होवो हीच प्रार्थना मारुती रायाच्या चरणी.
श्रद्धा व मनुष्याचे भौतिक जीवन
अशा वेळी पूर्ण श्रद्धेने व तेही सात्विक श्रद्धेने व सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने – उपासना केली तरच आत्मज्ञान होते. याजन्मी पुण्य कर्माचे – प्रारब्धाचे भोग भोगून एक नाही दोन नाही तीन नाही तर केंव्हा तरी कुठल्या तरी जन्मात प्रारब्धाचे देणे फिटल्यावर तरी आत्ताच्या जन्मातील सात्विक श्रद्धेने व ईश्वर अर्पण बुद्धीने पाच प्रकारच्या केलेल्या यज्ञ कर्माने – सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालील आचरणाने पुढे केंव्हा तरी प्रारब्धाची साखळी तुटून जेंव्हा केवळ पुण्यच ‘बॅलेंसशीट’ मध्ये जमेच्या बाजूस शिल्लक राहते तेंव्हा तरी पुढची पुनरावृत्ती टळते व आपणास मोक्ष प्राप्त होतो – आपण ब्रम्हस्वरुपास प्राप्त होतो. व तसे होणे केवळ या दुर्लभ अशा मनुष्यजन्मातच शक्य आहे. महत्प्रयासाने व पुण्यकर्मानेच मनुष्य जन्म प्राप्त होतो. इतर प्राणी – वनस्पती व जीवजंतू यांच्या जन्मात पुण्यकर्म वा सा






Recent Comments