वेदांत सप्ताह भाग दुसरा
भंडारखान्याच्या बाजूला असलेल्या श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवचनाआधी सर्वांना एक ग्लास थंडगार मसाला ताक देण्यात आले. स्त्रियांना व पुरुषांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, मधोमध श्रीजींचे व्यासपीठ, पाठीमागे श्रीमाणिकनगर संस्थानाचा श्रीप्रभु मंदिराच्या कळसाचे चित्र असलेला सुंदर फलक मन वेधून घेत होता. वातानुकूलित हॉल, बाहेरच्या दुपारच्या गरमीपासून शरीरास छान थंड करत होता. सर्वांना एक-एक वही आणि पेन देण्यात आला. ध्वनी व्यवस्थाही अद्ययावत होती. गीतेच्या सतराव्या अध्यायाची एक एक प्रतही सर्वांना दिली गेली. सर्व आयोजनामध्ये एक विशिष्ट प्रकारची सुसूत्रता होती. येणाऱ्या सर्व आस्तिक महाजनांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी श्री संस्थानाने घेतली होती.
वेदांत सप्ताह भाग पहिला
एव्हाना खोलीतले इतरजणही आले होते. कोल्हापूरचे साधले, कुलकर्णी, सांगलीचे कुलकर्णी आणि पुण्याचे पेटकरकाका अश्या ज्येष्ठांचा सहवास लाभला. दुपारी थोडासा आराम केला. चारच्या सुमारास चहा आला. सर्व जण चहाला जमले. अनेकजण महाराष्ट्रातील विविध भागांतून वेदांत सप्ताहासाठी आलेले. बरेचसे मागच्या पारायणाच्या आठवणींना उजाळा देत होते. प्रत्येकाचे वेगवेगळे कथाकथन गरमागरम चहाची घोटागणीक लज्जत वाढवत होता. दोन कप चहा घेतला. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. माझ्यासारखा एखाददुसरा पहिल्यांदाच सहभागी होत होता. सकलमत संप्रदायात कुठलाही भेदभाव नाही, ह्याचा पदोपदी अनुभव आपल्याला श्री माणिकनगरात येतो. जय गुरु माणिक हे तीन शब्द एकमेकांना प्रभुप्रेमाच्या एकाच माळेत सहजपणे गुंफतात.
श्रद्धा व मनुष्याचे भौतिक जीवन
अशा वेळी पूर्ण श्रद्धेने व तेही सात्विक श्रद्धेने व सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने – उपासना केली तरच आत्मज्ञान होते. याजन्मी पुण्य कर्माचे – प्रारब्धाचे भोग भोगून एक नाही दोन नाही तीन नाही तर केंव्हा तरी कुठल्या तरी जन्मात प्रारब्धाचे देणे फिटल्यावर तरी आत्ताच्या जन्मातील सात्विक श्रद्धेने व ईश्वर अर्पण बुद्धीने पाच प्रकारच्या केलेल्या यज्ञ कर्माने – सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालील आचरणाने पुढे केंव्हा तरी प्रारब्धाची साखळी तुटून जेंव्हा केवळ पुण्यच ‘बॅलेंसशीट’ मध्ये जमेच्या बाजूस शिल्लक राहते तेंव्हा तरी पुढची पुनरावृत्ती टळते व आपणास मोक्ष प्राप्त होतो – आपण ब्रम्हस्वरुपास प्राप्त होतो. व तसे होणे केवळ या दुर्लभ अशा मनुष्यजन्मातच शक्य आहे. महत्प्रयासाने व पुण्यकर्मानेच मनुष्य जन्म प्राप्त होतो. इतर प्राणी – वनस्पती व जीवजंतू यांच्या जन्मात पुण्यकर्म वा सा
ज्ञानप्रबोध भाग सातवा
भागवतचे पारायण वेदांत सप्ताहात ।रासक्रिडा त्यात खासकरून अंतर्भूत ।दोन गोपींमध्ये एक कृष्ण खेळत ।दोन ॐकारातील तोच परमात्मा ॥१२॥
ज्ञानप्रबोध भाग सहावा
पात्रता पहावी समोरच्याची तपासून । उपकार न करणाऱ्यास शोधून । दान करावे मग मनापासून । लक्षण सात्विक दानाचे ॥८॥
ज्ञानप्रबोध भाग चौथा
मानवी जीवनातील कर्माची रीत ।भौतिक, आध्यात्मिक जीवनाशी संबंधीत ।आध्यात्मिक उन्नतीकारणेस यज्ञकर्म संबोधित । उदाहरणासहित स्पष्टीकरण ॥३॥
Recent Comments