Catagories

वेदांत सप्ताह उत्साहात साजरा

वेदांत सप्ताह उत्साहात साजरा

संपूर्ण वेदांत सप्ताहात वीणेवर अखंड नामसंकीर्तन चालू असते. दररोज दुपारी विद्यमान पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांचे वेदांतपर शिक्षा शिबीर सर्व सर्व भक्तांच्या सहभागात पार पडले. ह्यावर्षी भगवद्गीतेतील कर्मयोगाचा तिसरा अध्याय श्रीजींनी सर्वांना समजेल व आचरणात आणण्यात सुलभ होईल ह्या प्रकारे समजून सांगितला. सायंकाळी माणिक नगर गावातील महिलांचे भजन, त्यानंतर संध्याकाळी बालगोपाल रास क्रीडा (कोल), नंतर ग्रामवासी यांचे भजन, तदनंतर श्रीजींचे रात्री कालीन प्रवचन तसेच

read more
नटली माणिकनगरी

नटली माणिकनगरी

सच्चित्सुखाची दिव्य अनुभूती अद्वैत सिद्धांत मिळवून देई, अखंड श्रीमाणिक नाम भजता हरी-हर दिसेल सर्वांठाई||

read more
महावस्त्र

महावस्त्र

आजच्या घडीला श्रीप्रभु जरी संजीवन समाधीत निजानंदमग्न असले तरी त्यांचे नामस्मरण, त्यांनी रचलेली पदे, श्रीप्रभुनंतरच्या पीठाचार्यांचे समग्र वाङ्मय, प्रवचने ही आपल्याला त्यांच्या स्पर्शरुपी ज्ञानवस्त्रांतच उपलब्ध आहेत.‌ ह्या दिव्य वस्त्रांचा स्पर्श आपणासही होऊन, आपली आध्यात्मिक उन्नती उत्तरोत्तर होत राहो, आपल्याला स्वस्वरुपाचे ज्ञान होवो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक.

read more
मनस्वी अभिनंदन

मनस्वी अभिनंदन

ह्या वेळीच्या श्रीदत्त जयंतीमध्ये पाहिलं तर माणिक नगरामधले वयोवृद्ध, महिला आणि पुरुष, तरुण मंडळी यांच्याबरोबरच लहान लहान मुलं ही श्रीजींचा प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित होती. काही नवजात अर्भकेही स्तनपान करता करता श्रीजींचे प्रवचन ऐकत होती. खरोखरच धन्य ती माणिक नगरची जनता, ज्यांना अध्यात्माचे हे बाळ

read more
जीव ब्रम्ह ऐक्य

जीव ब्रम्ह ऐक्य

त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूनंतर जीवनमुक्तांचे काय होते? याचा उहापोहसुद्धा श्रीजी आपल्या प्रवचनात करतात. श्रीजी म्हणतात, असा जीवनमुक्त विदेहमुक्तीस प्राप्त होतो. म्हणजेच, मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही. तो श्रीप्रभुस्वरूपात लीन होतो. कारण त्याची सर्व कर्मे नष्ट होतात. खरे तर, आपण आपल्या कर्मांमुळेच जन्म होतो. मग ज्ञानी जीवांचे कर्म नष्ट कसे होतात? तर ज्ञानी भोगाद्वारे आपले प्रारब्ध कर्म नष्ट करतो. आपल्या उपासनेने, आपल्या भक्तीने, भविष्यातील कर्मे नष्ट करतो, तसेच ज्ञानाने संचित कर्मे नष्ट करतो. जसे भाजलेले बी अंकुरित होत नाही त्याचप्रमाणे, जीवनमुक्त पुनर्जन्म घेत नाही. ह्यालाच विदेह मुक्ती म्हणतात.

read more