भेट माझ्या माणिकाची
मुख्य मंदिरात जाण्याआधी दरवाज्यावरील जय जय हो, सकलमता विजय हो ही पाटी लक्ष वेधून घेत होती. दरवाजा ओलांडल्यावर आत येताच दत्ताची गादी व त्यापुढील श्रीमाणिकप्रभूंची संजीवन समाधीचे दर्शन घडले. काळ्या दगडा
श्रीमाणिक नाम महिमा
गारगोटीस घासता गारगोसी । अग्नी प्रज्वलीत घर्षणेसी । मन घासता नामासी । आत्मज्योत तैसेचि ॥१॥ दगडासी घासीता पात । धारदार तेजपुंज होत । मन नामावर घासत । विकेकजागृती तेसेचि ॥२॥ सहाणेवर चंदन उगाळिता । सुगंधित करी आसमंता । नामसहाणेवर मन रगडिता । व्यक्तिमत्व...
श्री मनोहर माणिकप्रभु
आजचे जे भव्य असे प्रभुमंदिर डौलाने उभे आहे ते श्रीमनोहरप्रभुंनीच आपल्या कार्यकाळात संतरामदादा गवंड्याच्या मार्फत पूर्णत्वास नेले. श्रीप्रभुंच्या पूजा पद्धतीचे विधान, अनेक श्लोक, स्तोत्रे, पदे अप्पासाहेबांनी रचली. त्यांच्या पदांतून प्रभुभक्ती व प्रभुविरह प्रकर्षाने जाणवतो. आपल्या लहान भावाचे लग्न लाऊन त्यांना आपला उत्तराधिकारी नेमले. अप्पासाहेबांनी अनेकांचा उद्धार केला. सतत प्रभुनामात दंग असलेल्या श्रीमनोहर माणिकप्रभुंनी वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली.
ताज पे साज
पान no. 11 वर महाराजश्री शिव शंकरालाच मन नियंत्रित करण्यास बोलावतात कारण मन हे नियंत्रणासाठी अतिशय दुष्कर आहे असे लिहिले आहे. श्री ज्ञानराज महाराजांच्याही एका पदात प्रभू तुम्हारे पद कमल पर मन सदा एकाग्र हो मध्ये ते माणिक प्रभूंना प्रार्थना करतात की माझे मन एकाग्र होऊ दे. माणिकप्रभु उत्तरादाखल अप्रतिम मौक्तिक देतात. म्हणतात, मन स्थिर झाले तर ते मन कुठले? ते तर आत्मरुप झाले.
प्रसाद
५०० कि.मी. हुन अधिक अंतर गाडी चालली होती. प्राथमिक अंदाजानुसार बॅटरी व सेल्फ सुरूवात होत नसल्याचे कारण पहायचे होते. मी गाडीतून खाली उतरलो. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास खुणेनेच सांगितले. तेवढ्यात एक दुचाकी समोर येऊन थांबली. त्यावर दोन गृहस्थ होते. त्यांनी विचारपूस केली, व त्यांच्यापैकी एक गाडी मागे गेला. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास सांगू लागला. तर दुस-या व्यक्तीने मला गाडीचे बॉनेट उघडण्यास सांगितले व गाडी तपासली. बॅटरी कनेक्टर सैल झाले होते ते तात्पुरते ठीक करून दिले. व आम्हाला सांगितले की तात्पुरते काम केले आहे,
तू चुकु नको आत्मा रामा
नौबतखान्यात मध्यरात्रीची नौबत व शहनाई वाजत होती. श्री मार्तंड प्रभूंनी शहनाई वाजविणान्यास बोलावून घेतले व विचारले ‘‘तू कुठलं गाणं वाजवीत होतास ?’’ शहनाईवाला घाबरून गेला व म्हणाला – ‘‘महाराज, कालच तुळजापूरचे काही गोंधळी आले होते, त्यांच्या तोंडून मी ही धून ऐकली, मला आवडली, म्हणून मी वाजवली.’’ महाराज म्हणाले – ‘‘असतील तेथून त्या गोंधळ्यांस बोलावून घेऊन ये.’’
Recent Comments