भेट होता समोरासमोर, म्हणावे आधी जय गुरु माणिक,

निरोप घेतानाही शेवटी म्हणावे आनंदे जय गुरु माणिक,

प्रापंचिक कर्मे करता साक्षी ठेवावा, हा श्रीगुरु माणिक,

प्राप्त सुखदु:खातही समान स्मरावा हा श्रीगुरु माणिक,

प्रातःकाळी उठता स्मरण करुन म्हणा जय गुरु माणिक,

निद्रासमयी कृतज्ञता व्यक्त करुन वदा जय गुरु माणिक,

सद्भक्तांची आळ सदोदित पुरवितो, हा श्री गुरु माणिक,

आत्मस्वरुपाचे ज्ञानही करवून देतो, हा श्री गुरु माणिक,

परनिंदा, द्वेष गळोनि जाय, घोष होता जय गुरु माणिक,

सकल धर्म अन् जाती एकसुरे गर्जती, जय गुरु माणिक,

मुख्य उपदेश आम्हा, श्रीगुरु माणिक, जय गुरु माणिक,

मुखामध्ये नित्य असावे श्रीगुरु माणिक जय गुरु माणिक

[social_warfare]