प्रभु कृपेची ही किमया

अशी माया अशी छाया
संभाळी थकली काया
भाग्य जणु आले नशिबा
प्रभु कृपेची हि किमया ।।१।।

उतरंडीचा मार्ग बिकट हा
भिती ना वाटे परी मना
धरूनी हात घट्ट सांभाळी
नान्य, ही तर प्रभु योजना ।।२।।

कसे सुचावे अन्य मागणे
आधार निरंतर असा असो
सहजी उतार व्हावा सोपान
प्रभु हस्त शिरी सदा असो ।।३।।

नाम प्रभुंचे असो सदा मुखी
मना दुजे ना वेड जडो
संग गुरुंचा सत्संगत सदैव
जन्मोजन्मी अशिच घडो ।।४।।

अशिच प्रचिती तुझ्या कृपेची
राहीली यात्रा सुसह्य होण्या
असेच दान लाभो जन्मांतरी
हिच केवळ मनी याचना ।।५।।

महाराजांचा जन्मदिवस

 

आज आमचे असिम श्रद्धास्थान सद्गुरू श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराज यांचा जन्मदिवस ! आम्हा सकलमत सांप्रदायिना अतिशय आनंददायी आणि श्रध्दापुर्ण दिवस !
अध्यात्मिक ग्रथांचा सखोल अभ्यास आणि अतिशय सोप्या भाषेत , व्यवहारातील दाखले देत त्याच विवेचन करून समजावण्याची कला , भगवदगीतेवरची ओघवती भाषेतील निरूपणं म्हणजे भक्तांसाठी पर्वणीच !
हिंदी , मराठी , इंग्रजी , कानडी , तेलगु एवढच नव्हे तर उर्दु आणि संस्कृत भाषेवरिल प्रभुत्व , केवळ विस्मयजनक ! माणिकनगरची धार्मिक , शैक्षणिक , क्रीडा , सामाजिक इ . क्षेत्रांतिल त्यानी घडवुन आणलेली प्रगति केवळ अलौकीक !
असे दैवी व्यक्तीमत्व आम्हा सांप्रदायिना गुरूस्थानी लाभावे , हि साक्षात प्रभुकृपाच !
आज श्रीजींच्या जन्मदिनी , त्यांच्या चरणी शतकोटी प्रणाम करताना प्रार्थना करतो कि
प्रभुभक्तिचा आमच्या तिनहि पिढयांतिल वारसा पिढयान्पिढ्या वृद्धींगत होत राहो आणि प्रभुकृपेचा वरद्हस्त अखंड , अविरत लाभत राहो .

कां रे मना अल्लड धावसि तू

कां रे मना अल्लड धावसि तू

टाळुनि गुरुच्या मार्गाला

विसरुनि श्रीगुरु भजनाला

वृथा रमसि भव नादी रे॥१ ॥

 

विषयांच्या नादात अडकुनी

व्यर्थ दवडिसी जीवन हे

गुरुचरणी तू लाग त्वरेंने

जाय समुळ भवव्याधी रे॥२॥

 

मूढ मना किति सांगू आता

धरि तू श्रीगुरु चरणा रे

सिद्धज्ञान गुरु माणिक प्रभु तू

पार करी या दीना रे॥३॥