
अशी माया अशी छाया
संभाळी थकली काया
भाग्य जणु आले नशिबा
प्रभु कृपेची हि किमया ।।१।।
उतरंडीचा मार्ग बिकट हा
भिती ना वाटे परी मना
धरूनी हात घट्ट सांभाळी
नान्य, ही तर प्रभु योजना ।।२।।
कसे सुचावे अन्य मागणे
आधार निरंतर असा असो
सहजी उतार व्हावा सोपान
प्रभु हस्त शिरी सदा असो ।।३।।
नाम प्रभुंचे असो सदा मुखी
मना दुजे ना वेड जडो
संग गुरुंचा सत्संगत सदैव
जन्मोजन्मी अशिच घडो ।।४।।
अशिच प्रचिती तुझ्या कृपेची
राहीली यात्रा सुसह्य होण्या
असेच दान लाभो जन्मांतरी
हिच केवळ मनी याचना ।।५।।
Recent Comments