ध्यानस्थ होऊनी
प्रकाश देती
अंधःकार दूर करती
भक्तांचे

सगुण रूप धारण करुनी
कृपादृष्टी देती
सन्मार्गी लावीसी भक्तांसी

भक्ती मार्गास लावोनी
कल्याण करिती , चैतन्य जागविती
अगणित जीवांचे

तू तेच आहेस
मी ब्रह्म आहे
जागृत करिती अंतरआत्म्याचे

कृपादृष्टी ठेवुनी
कल्याण करिती
ज्ञानामृत अंकुरती
पामरांचे

[social_warfare]