मंतरलेली रात्र
त्यावेळी सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री सिद्धराज प्रभु म्हणाले होते, की तुमच्या इच्छेनुसार मी श्रीप्रभुंची पदे म्हणेन, पण ती कोणत्याही इतर ठिकाणी न म्हणता श्रीप्रभु मंदिरातच म्हणेन. आणि ध्वनिमुद्रणाच्या तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून, त्यांची उपेक्षा करून आपल्या आवडत्या वादकांना घेऊन श्री सिद्धराज प्रभूंनी आपल्या दैवी स्वरामध्ये ही पदे अत्यंत भावविभोर होऊन गायली होती. काय मंतरलेली रात्र असेल ती. माणिक नगर म्हणजे संगीताचे माहेरघरचं आणि त्यातही श्री सिद्धराज प्रभुंसारखे सुरांचे आणि संगीताचे मर्म जाणणारे, आपल्या गायनाचे सर्व कसब पणाला लावून,
दत्त तीर्थ धाम
चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा
गुरु हाचि माय बाप
गुरुमुळेच पुढची वाट मुमुक्षूस दिसे या जन्मात, धरिले एकदा का बोट गुरूंचे |
धरला हात सोडू नको
स्वच्छंदे व्यवहारे राहसि, सतत गुरुगंगा विरजा तीरी करी कृपा मजवरी सत्वरी, माणिक मुक्तिनाथा हरी स्थितप्रज्ञ अससी जरी, माया कर्दमी आता ठेवू नको अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको
ज्ञानियांचा राजा
संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!
श्रवणाची पर्वणी
तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.





Recent Comments