सगुण ध्यान
आपण जर श्री ज्ञानराज माणिक प्रभुंची वेदांतपर प्रवचन ऐकत असाल, तर श्रीजींनी आपल्यावर केलेले अद्वैताचे संस्कार येथे आपल्या अंतर्मनाशी चाळ करू लागतात. मी कोण आहे, याची असीम, विराट आणि व्यापक जाणीव आपल्याला होते. येथे कवीने आपल्याला केलेला निर्देश फार महत्त्वाचा आहे. सगुणातून निर्गुणाला ओळखण्याची गुरुकिल्ली जणू कवी आपल्या हाती सोपवत आहे. आणि एकदा का आपल्याला ह्यातील मेख कळली की पुढचं सर्व काही प्रभु पाहून घेईल, हे आश्वासनही आपल्याला प्रभु बरसायेंगे… ह्या काव्यपंक्ती करून देतात. प्रभुंचा कृपेने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होऊन, सर्वत्र ज्ञानाची प्रभा फाकेल हा विश्वासही अंतरात दृढ होतो.
श्रीजींचा नाशिक दौरा
दुपारच्या भोजनानंतर तपोवन येथील श्री लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या नव्याने बांधलेल्या सुसज्ज धर्मशाळेमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, हैद्राबाद वैगरे बाहेरगावावरून आलेल्या प्रभुभक्तांच्या उतरण्याची सोय केली होती. तपोवनसारख्या पुण्यभूमीत, गोदावरी नदीच्या काठी असलेला आमचा निवास मनाच्या सात्विकतेत अधिकच भर घालत होता. थोडावेळाने आवराआवर करून आम्ही गंगापूर नाक्याजवळील शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी सभागृहामध्ये श्रीजींच्या प्रवचनासाठी जमलो. दौऱ्यादरम्यान श्रीजींचा ज्ञानयज्ञ ही उपस्थितांसाठी मोठी पर्वणीच असते. पाचकशे लोकांहून अधिक लोकांच्या बसण्याची क्षमता असलेले सभागृह खचाखच भरले होते. काही जण उभेही होते. श्रीजींच्या आगमनाबरोबरच चैतन्याची एक लहर सभागृहात उमटली. भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष झाला. श्रीजींना पाहून नाशिककरांच्या यांच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच उ
श्रीमाणिक ज्ञानयज्ञ सोहळा नाशिक
हा तीन दिवसीय कार्यक्रमाचा कालावधी थोडा जास्त हवा अश्या प्रतिक्रिया भरपुर भक्तांनी आमच्या पर्यंत पोहचवल्या. पुढे तसा प्रयत्न नक्कीच करु कारण बरेच नाशिककर महाराजांच्या अमृत वाणी पासुन वंचित राहीले. पाद्यपूजेचे अनुभव आमच्या पर्यंत भाविकांनी पोहोचवले की साक्षात दत्तप्रभुंचेच दर्शन झाले आहे.
मायबाप कल्पतरू
माऊली हे माऊली आहेत. प्रत्येक शब्द न शब्द गहन अर्थाने वापरला आहे. पण त्यातल्या त्यात चतुर्भुज हा शब्द मोठा विचारप्रवर्तक आहे. संतांची भेट झाल्यावर चतुर्भुज होणे म्हणजे काय? ते म्हणतात, चार भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. त्या पैकी अर्थ व काम हे दोन पुरूषार्थ म्हणजे या दोन भुजा स्थूल आहेत. धर्म आणि मोक्ष या दोन भुजा सूक्ष्म आहेत. त्यात बारकावा आहे. त्या वाढल्या म्हणजे काय झालं? तर संतांच्या भेटीमुळे या दोन क्षेत्रात वर्धिष्णूता आली. अशा ह्या चार ही भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. या
वेदांत सप्ताह उत्साहात साजरा
संपूर्ण वेदांत सप्ताहात वीणेवर अखंड नामसंकीर्तन चालू असते. दररोज दुपारी विद्यमान पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांचे वेदांतपर शिक्षा शिबीर सर्व सर्व भक्तांच्या सहभागात पार पडले. ह्यावर्षी भगवद्गीतेतील कर्मयोगाचा तिसरा अध्याय श्रीजींनी सर्वांना समजेल व आचरणात आणण्यात सुलभ होईल ह्या प्रकारे समजून सांगितला. सायंकाळी माणिक नगर गावातील महिलांचे भजन, त्यानंतर संध्याकाळी बालगोपाल रास क्रीडा (कोल), नंतर ग्रामवासी यांचे भजन, तदनंतर श्रीजींचे रात्री कालीन प्रवचन तसेच
नटली माणिकनगरीtest
सच्चित्सुखाची दिव्य अनुभूती अद्वैत सिद्धांत मिळवून देई, अखंड श्रीमाणिक नाम भजता हरी-हर दिसेल सर्वांठाई||
Recent Comments