झोळीपूजा आणि अन्नपूजा
प्रभु समाधीच्या अन्नपूजेच्या ह्या प्रथेचा मागोवा घेतला असता, श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासून अन्नपूजेची प्रथा सुरू झाल्याचे कळते. श्री माणिक प्रभुंचे शिष्य असलेले दुबळगुंडीचे रामण्णापंत यांना, श्रीप्रभु जयंतीच्या दरबाराची सांगता अन्नपूजेने करा, अशी आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली आणि तेथूनच ह्या अन्नपूजेची परंपरा सुरू झाली. त्यानंतरच्या श्रावणमासाच्या अनुष्ठानाची सांगता, श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी पुजारी वर्गाने अन्नपूजेने करावी, अशी ही आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली. श्रावण मासाच्या अनुष्ठान समाप्तीच्या अन्नपूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, भाद्रपद प्रतिपदेला श्रीप्रभु गादीच्या पीठाधीशांच्या
श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका
श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका,श्रीदत्त जयंती महोत्सव निमंत्रण पत्रिका
नेटवर्क मध्ये येणे
एकदा द माणिक पब्लिक स्कूल मधील मुलांचे श्रीजीं सोबत ‘संवाद’ या कार्यक्रमात प्रश्न-उत्तर session सुरू होते. ‘एकच परमात्मा सगळ्यांनमध्ये कसा असू शकतो’ या प्रश्नाचे उत्तर देतांना श्रीजींनी मुलांना समजेल असं मोबाईलचं उदाहरण दिलं की जरी सगळ्यांकडे device व sim वेगवेगळे असो पण नेटवर्क एकच आहे . ते दिसत नसले तरी फोन सुरू असणे हे त्याचे proof आहे. तसेच परमात्म्याचे आहे… भलेही अनेक रूपे असोत पण तत्व एकच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये त्या एकच परमात्म्याचा अंश आहे
जब तलक मैं था
एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.
श्रीप्रभुमनोहराख्यान
श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता । नृसिंहतात्या नामे विख्याता । विठाबाई पत्नी पतीव्रता । तात्या महाराजांची ॥१॥ नाईक घराण्याची वंशवेल । नृसिंहतात्याच आता फुलवेल । दत्तप्रसाद लवकरच भेटेल । आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥ होते कालयुक्ति नाम सवंत्सर । श्रावण अमावास्या दिवस...
माझ्या मनीची तृष्णा
माझ्या मनीची तृष्णा शमविशील का रे कृष्णा श्वासही घेतला उसना तुझ्याकडूनच ।। तुझ्याकडूनच सर्व येते अंती तुझ्यातच सामावते परी येते मीपणाचे भरते अहंकारामुळे ।। अहंकारामुळे कंस गेला शिशुपालही तैसाच वधिला काम क्रोधे कोण वाचिला, त्रिभुवनांत ।। त्रिभुवनांत तुझा संचार प्रेमाची...






Recent Comments