‘आटपाट नगर होतं.तेथे एक सत्शील गरीब ब्राह्मण रहात होता’…अश्या श्रावण कथांमधून मोठे झालेले आम्ही, व्रत महिमा मंडीतकारी होतो.

काळ बराच मागे निघून गेला तसा रूपया बरोबर मूल्यांचे ही अवमूल्यन झालेले पहात आलो आपण. मग ती वैचारिक भेसळ असो किंवा खाद्यपदार्थांची! आजही तुकारामांचा कळस क्रमप्राप्त आहेच.लढा दिल्याशिवाय सोन्यालाही झाक येत नाही हे तंतोतंत खरे आहे.

आज गुरुगंगा नदीवर झालेले प्रदूषित आक्रमण कोणाच्याच नजरेतून सुटू शकत नाही. त्यासाठी सजग असणारे आदरणीय श्री आनंदराज महाराज आणि आदरणीय श्री चैतन्यराज महाराज यांच्या सशक्त नेतृत्वाखाली भव्य लोकसमूह एकत्रित झालेला पाहिला. दोन्ही सन्मानियांची देहबोली रोखठोक असली तरी दोन परस्पर विरुद्ध गुणांचा कमाल मिलाफ आढळला.भाषेतला अत्यंत संयम पण तेवढीच दमदार तडफ. दुर्मिळ संगम! आज पुनश्च एका दासबोधातील ओवीचे दर्शन घडले.
हे धकाधकीची कामे।तिक्ष्ण बुद्धीची वर्मे।भोळ्या भावार्थे संभ्रमे।कैसे घडे।।19.7.19।।

केवळ भोळी श्रद्धा ठेवून कामं होत नाहीत, तिक्ष्ण बुद्धीने वर्म ओळखुन करणे अपेक्षित असते त्याचा प्रत्यय या उठावातून जाणवला.

काही शतकांपूर्वी प्रभूंनी नेटका सामना करण्यासाठी दंड अभिमंत्रित करून दिले होते. ते दंड आजही या सशक्त नेतृत्वाच्या हाती आहेत– माईकच्या स्वरूपात, जनजागृतीच्या स्वरूपात. आजही प्रभूच या उभयतांच्या स्वरूपात ठाम उभे आहेत निःशंक!! श्रीजींचा अभय वरदहस्त आहेच. आपल्या या कार्यास अनेक शुभेच्छा.

[social_warfare]