नटली माणिकनगरीtest

नटली माणिकनगरी वेदांत सप्ताह महोत्सवास्तव||
लोटले असंख्य प्रभुभक्त स्वस्वरुप जाणण्यास्तव||१||

संगम ज्ञानमय उपासना व प्रेमयुक्त भक्तीचा||
फाल्गुन वद्य पक्षांत सोहळा ज्ञानोत्सवाचा||२||

अतिउत्साह व जल्लोषात साजरे होतसे हे ज्ञानपर्व||
सर्वसमावेशक सकलमत सांप्रदायिक सण हा अपूर्व||३||

श्री मार्तंडमाणिकप्रभुंसह श्री शंकरमाणिकप्रभुंचे आराधना-स्मरण||
सप्ताही अंतर्भूत करून कृतज्ञ-नतमस्तक होती श्रीप्रभुंचे भक्तगण||४||

अखंड वीणा कीर्तनासह अविरत व्याख्यान सत्संग||
पारायण पुजन अर्चन भजनांत श्रद्धावान दंग||५||

नेत्रदीपक दिंडीचा दिमाखदार अद्भुत नजारा||
तालवाद्ये सुरेल भजनांनी भरतो आसमंत सारा||६||

श्री प्रभुंच्या भंडारखान्यात कृपावंत अन्नपूर्णा सदैव तत्पर||
अविट चवीचा प्रसाद चाखण्या सुरवरही राहती हजर||७||

सच्चित्सुखाची दिव्य अनुभूती अद्वैत सिद्धांत मिळवून देई||
अखंड श्रीमाणिक नाम भजता हरी-हर दिसेल सर्वांठाई||८||

प्रभुदरबाराची वारी भाग्यकारक अति आगळी||
स्वानंद अनुभवती निशीदिनी भक्तांची मांदियाळी||

कला गुणांचा मनोहर मिलाफ

 

श्रीसिद्धांच्या पूण्यप्रद श्रीमाणिकनगरीचे वंशज||
संत मिरेसम हरीभक्त श्रीहराचे प्रिय-आत्मज||१||

प्रतिभावंत बुद्धिवंत सखोल आभ्यासु चिकित्सक वृत्ती||
लेखन काव्य वक्तृत्वासह भाषांवर प्रभुत्वाची व्याप्ती||२||

निस्वार्थी सदाचारी आवड सामजिक सेवाभावाची||
भावनाप्रधान निष्काम चर्येवर मुद्रा बालभावाची||३||

प्रज्ञा-कला-गुणांचा मनोहर मिलाफ श्री ज्ञानराजजी||
माणिकरत्नशिरोमणी शोभे प्रभूंच्या किरीटामाजी||४||

निरुपणाने ज्यांच्या होई अज्ञानाचा सहज लय||
आचरण ठेवता तद्वत जिव बने सुबुद्ध ज्ञानमय||५||

प्रभावी भाषाशैलीने करवता बिकट-परमार्थाचा सुलभ प्रवास||
भक्तवर्ग तुमच्या सत्संगात साधतो भौतिक आत्मिक विकास||६||

खंबीर नेतृत्वाने तुमच्या मिळालं श्रीसंस्थानाला नवं रुप-चेहरा||
भक्तवत्सला नित्य अन्नदानासह सुविधायुक्त केलात यात्री निवारा||७||

तुमच्या साहित्यसेवेचा ‘सकलमत सिद्धांत’ वंदनीय||
‘माणिकरत्न’ मासिकासह स्तोत्रं-ग्रंथ-पुस्तकं सुवाचनिय||८||

किती प्रेमाने अभिमानाने भक्त तुम्हास म्हणती श्रीजी प्रभु||
गुरुस्थानी तनुस तुम्ही जन्मदिनी स्विकारावे काव्यपुष्प हे विभु||९||