हे ध्यान तुझे किती सुंदर हो श्रीप्रभुराया
दे सन्मती मजला सद्गुण तुझिया गाया

काम क्रोध वसती मनी मजला हो खाया
तारी प्रभो मजला, जातसे मी असा वाया

पदोपदी फसवी मज, दूर्धर ही तव माया
यमदूतही बसले टपूनि मजला हो न्याया

वारूनि संकट हे तारी मजला श्री गुरुराया
तनमन माझे सर्वही अर्पण तव निजपाया

भक्तांस्तव झिजवी नित्य तुझी ही काया
अससी सदा तत्पर घास कृपेचा भरवाया

दरवळ तव नामाचा जैसा सुगंधित फाया
दे स्फुरण अंतरी तारक नाम तुझे घ्याया

कृपादृष्टी मजकडे पहा हो श्री प्रभुराया
आनंदे ओवाळीन तुजवरूनि मम काया

हे ध्यान तुझे किती सुंदर हो श्रीप्रभुराया
दे सन्मती मजला सद्गुण तुझिया गाया

[social_warfare]