कृष्णा मजकडे पाहू नको…
राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्, यांतच आनंद आहे.
शरणागती
श्रावण पोर्णिमा निमित्त शरणागती विषयी माणिक प्रभु संप्रदायातील सगळया पिठाधिपतीनी समृद्ध केलेल्या पद्यमालेतील विविध भाषेतील रचनांचा तसेच देव देवतांचा संदर्भ देत शरणागती विषयी फार चित्तवेधक विवेचन केले ते ऐकून आजचे सर्व सामान्य भक्तांचे जीवन डोळयासमोर आले आणि त्या अनुषंगाने एक सामान्य जनतेचा विचार येथे प्रकट करण्याचे धाडस करतो. अध्यात्मिक परंपरेतील भक्त आसक्ति आणि दैनंदिन जीवना विषयी विन्मुखता या चक्रव्यूहात सापडलेला असताना भयाने नियतीने दिलेल्या स्थितिस अनुसरून नियत कर्मापासून परामुख होवून आणि असहाय होवून शरणागती स्विकारतो अशीच भावना प्रकट होते आणि वैराग्य चे आवेशात दुबळी माणसे जिवन विन्मुख होतात ही बाब खरोखर विचार करण्या सारखी आहे त्या पेक्षा तुझ्या आजच्या जीवनात जी भूमिका आहे आणि तिला अनुसरून तुझी जी भूमिका आहे तिला न्याय देत प्रभुचे जे निर्गुण रूप आहे त्या शक्तीशी सायुज्य पावणयासाठी तळमळ आणि उत्कटता कायम ठेव कारण आपली नियत कर्मे आणि जबाबदारी पार पडल्या नंतर हीच तळमळ आपले भांडवल राहणार आहे हाच मतितार्थ प.पु. ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांच्या प्रवचनातून मिळाला अशी माझी भावना झाली.
योगक्षेमं वहाम्यहम्
एक छोटीशी झांजच ती! तिचे एवढे काय कौतुक??कौतुक एवढ्यासाठी की शंभर वर्षाहून अधिक काळ ही झांज आमच्या कुटुंबात असावी. कारण ही झांज आमच्या पणजोबांच्या बालपणापासून तरी नक्कीच आमच्याकडे आहे असे माझे आजोबा सांगायचे आणि पणजोबांचा जन्म १९०० सालचा होता. दुसरे असे की असा नाद व आवाजाचा गोडवा असलेली झांज आजपर्यंत शोधुनही कुठे मिळाली नाही. गणेशोत्सवात व नवरात्रोत्सवात बऱ्याच ठिकाणी आम्ही ही उपयोगात आणतो. ज्या आप्तांकडे आरती अथवा भजनाला आम्ही जातो त्यांचा आग्रहच असतो की येताना ही झांज आठवणीने घेऊन यावी.
गुरुदक्षिणा
पण खरंच सद्गुरुला काहीच अपेक्षा नसते का शिष्याकडून? असते न, एवढीच अपेक्षा असते की त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा शिष्याने अवलंब करावा, त्यांची शिकवण मनात खूप खोलवर रुजवून, त्यांच्या तत्त्वांना शिष्याने आपले जीवन-सिद्धांत बनवावे.. आणि ही अपेक्षा सुद्धा कशाकरिता, तर शिष्याच्याच आध्यात्मिक उत्कर्षाकरिता! कारण असे केल्याशिवाय हा भवसागर पार करून जाणे अशक्य आहे. प्रभुंनी दुसऱ्या एका पदात समजावलेच आहे-
वेद पाठशाला का रजतमहोत्सव
प्रतिवर्ष गुरुपौर्णिमा के अवसर पर वेद पाठशाला के भूतपूर्व विद्यार्थी, माणिकनगर में एकत्रित होकर गुरुवंदना का कार्यक्रम अत्यंत उत्साह सहित आयोजित करते हैं। गत अनेक वर्षों से यह परंपरा सुनियोजितरीति से चली आ रही है। इस वर्ष की गुरुपौर्णिमा का पर्व अत्यंत विशेष होने वाला है। इस वर्ष श्री माणिकप्रभु वेद संस्कृत पाठशाला की स्थापना को २५ वर्ष पूर्ण हुए हैं। इस उपलक्ष्य पर सभी भूतपूर्व विद्यार्थियों ने वेद पाठशाला का रजतमहोत्सव आयोजित करने का संकल्प किया है। ९ जुलाई से १३ जुलाई तक संपन्न होने वाले रजतमहोत्सव में विविध कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। इन पांच दिनों
ज्ञानसागर
सगळे प्रभूने हिरावले, देहवासना हिरावली, आता सुख दुःखाच्या लाटांची काय तमा? अशी प्रभूने कृपाच केली सांगणारे प्रभूने मेरा सबकुछ छिना हे पहिल्या लाटेचे गाणे .ज्ञान नही अब कुछ करनेको यातील श्लेष चिंतनीय ठरला.त्यात न्हाऊन निघालो तोच सत्य एकच असते हे सूत्र जहाँ मै अडा हू द्वारे चपखल पटवून दिले. करो दस्तखत मै कोरी वही हू यातील समर्थता अगस्तिनच्या आचमनाची आठवण देऊन गेली.याही लाटेचा आस्वाद घेतला. मननाची डुबकी मारली. तोवर अजून एक लाट आली. अति सुंदर अशी ती लाट!! ती लाट म्हणाली,नाम आणि रुपात अडकेल तो प्रभू नाहीच. प्रभू तर त्याच्याही अतीत आहे. पण ते ज्ञान होण्यासाठी नाम हे साधन आहे . नाम जिसका है न कुछ ने नवा आयाम दिला. उत्तरोत्तर उपनिषदांकडे कूच करताना ज्याची सर्वांना जिज्ञासा असते ते ब्रह्म कुठे पाहायला मिळेल का? याचे उत्तर वही है ब्रह्म उसे पहचान मध्ये विस्तृत सांगितले, एका अर्थी ब्रह्मदर्शन च घडवून दिले.






Recent Comments