दर पौर्णिमेला माणिकनगरला जायचं म्हटल की ,काही जन म्हणतात काय वेड लागलंय का काय तुला दर महिन्याला पौर्णिमा आली की माणिक नगरला पळतोस! तर आमच्या भाषेत वेडच आहे ते आणि आम्ही प्रभूचेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही तिथं जालच कशाला? बरोबर ना? वेळ आल्यावर्ती वेडेच कामाला येतात बरं आणि शहाणे दुरूनच पळून जातात. वरून अस विचारतात की काय मिळतं तिथं सारखं सारखं जाऊन?
कामधंदे सोडून पळताय अस काय आहे माणिक नगरला ? तर मग आइका. अहो कामधंदे सोडून आम्ही जात नाही तर आम्ही आमच्या प्रभूंसाठी वेळात वेळ काढून जातो, त्यांच्या दर्शनासाठी जातो. मंदिराच्या नऊ पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरी चढल्या वरती चांगली आणि वाईट केलेली सर्व कर्म आठवतात आणि डोळे भरून येतात – ते आहे माणिकनगर! आयुष्यातील सगळी दुःख विसरून, घरची, बाहेरची कटकट विसरून दोन दिवस जे सुखाने जगतो ना, जिथं खऱ्या सुख आणि समाधानाचा आभास होतो तेच आहे – माणिकनगर! दर पौर्णिमेला श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांची आमृतवाणी त्यांच्या आगदी समोर बसून आईकण्याचे भाग्य मिळते, भक्तिमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! सर्व जाती धर्माची माणस, श्रीमंत असो वा गरीब जिथं एकत्र येतात, भंडारखाण्यात एकत्र महाप्रसाद घेतात ते पुण्य ठिकाण आहे – माणिकनगर! जिथं सर्व सुख दुःखाची, पाप आणि पुण्यांची बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काही राहत नसेल आणि तरी सुद्धा काहीतरी मिळणारच ते स्थान म्हणजे – माणिकनगर! मुलांचे शिक्षण, मुला, मुलींची लग्न, नोकरीत बढती, आरोग्याच्या तक्रारी, व्यवसायात वाढ हे सर्व मनासारखं जिथं होत ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! जिथे मोठ मोठे योगीपुरुष, नतमस्तक होतात, मोठ मोठी संतपुरुष वेगवेगळ्या रूपाने येऊन जातात. अहंकार जिथं गळून पडतो आणि मग अक्कल ठिकाण्यावरती येते, आपराध केल्याची जिथं जाणीव होते ते स्थान म्हणजे – माणिकनगर!
असं आहे बघा आमच्या श्री माणिक प्रभूंचे माणिकनगर! आणि तुम्ही म्हणता काय मिळत सारखं माणिकनगरला जाऊन? आहो हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह माया पासून सुटूच शकत नाही, मग जो पर्यंत प्रभूंच्या जवळ जाण्याची बुद्धीचं होणार नाही तो पर्यंत समजणार नाही की काय आहे हे – माणिक नगर!
[social_warfare]
मनातील भावना व्यक्त केल्यात धन्यवाद !
शंभर टक्के खरं… अप्रतिम शब्दांकन…keep it up
प्रभू कृपा
प्रभूंची कृपा झाल्याशिवाय मनिकनगर ला कोणी जाऊ शकत नाही ,हे तितकच खर आहे
हे त्रिवार सत्य आहे
jai guru manik🙏
Jai Guru MANIK SRI SADGURU MANIK PRABHU MAHARAJ KI JAI
महेश, छान शब्दात तुझे मनोगत व्यक्त केले आहेस. प्रभुंची दिव्यदृष्टी पिढ्यानपिढ्या येण्याऱ्या भक्तावर जेवढी असते ( भक्तांचा समज ) तेवढीच कालपरवा पूर्ण श्रद्धेने आलेल्या भक्तावर पण असतेच असते. तुझे आचार-विचार या मनोगतातून प्रकट झाले आहेत. यातून आम्हा सर्व भक्तांना प्रभुसेवेची प्रेरणा मिळणार आहे. प्रभुमंदिराच्या ९ पायऱ्या चढून महाद्वारातून आत जावून प्रभुच्या कवेत स्थिर व्हायचे आहे हे आपल्या सदैव स्मरणात असायला हवे.
जय गुरु माणिक.
प्रभू कृपा
महेश भाऊ अप्रतिम शब्दांकन आहे महाराजांच्या चरणावर लिन होण्याकरिता भक्त व भक्ती अटळ हवी जी तुझ्यात आहे मला स्वतः ला अजून माहित नाही कि गुरु माणिक व त्यांच्या बद्दल कृपया मला कश्या प्रकारे त्याच्या बद्दल माहिती मिळेल हे सांगावे….. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ साईनाथ महाराज कि जय. जय गुरु माणिक 🙏
आपण कितीही ठरवलं तरी श्री प्रभुंच्या सूची मध्ये आपले नाव समाविष्ट करण्यात आले तरच आपण श्री प्रभुंच्या चरणी लागु शकतो.त्यांना आपल्याला दर्शन घेण्यासाठी संमती मिळाली तरच शक्य होते अन्यथा ते
अत्यंत दुर्मिळ होत जाते. जय गुरू माणिक
श्री गुरू माणिक…🚩🚩🌹🌹🙏🙏
जय गुरु माणिक 🙏
Jai guru manik 🙏🌹🌹🙏
Jai guru manik
🙏🙏Jay guru manik 🙏🙏