श्रीसिद्धांच्या पूण्यप्रद श्रीमाणिकनगरीचे वंशज||
संत मिरेसम हरीभक्त श्रीहराचे प्रिय-आत्मज||१||
प्रतिभावंत बुद्धिवंत सखोल आभ्यासु चिकित्सक वृत्ती||
लेखन काव्य वक्तृत्वासह भाषांवर प्रभुत्वाची व्याप्ती||२||
निस्वार्थी सदाचारी आवड सामजिक सेवाभावाची||
भावनाप्रधान निष्काम चर्येवर मुद्रा बालभावाची||३||
प्रज्ञा-कला-गुणांचा मनोहर मिलाफ श्री ज्ञानराजजी||
माणिकरत्नशिरोमणी शोभे प्रभूंच्या किरीटामाजी||४||
निरुपणाने ज्यांच्या होई अज्ञानाचा सहज लय||
आचरण ठेवता तद्वत जिव बने सुबुद्ध ज्ञानमय||५||
प्रभावी भाषाशैलीने करवता बिकट-परमार्थाचा सुलभ प्रवास||
भक्तवर्ग तुमच्या सत्संगात साधतो भौतिक आत्मिक विकास||६||
खंबीर नेतृत्वाने तुमच्या मिळालं श्रीसंस्थानाला नवं रुप-चेहरा||
भक्तवत्सला नित्य अन्नदानासह सुविधायुक्त केलात यात्री निवारा||७||
तुमच्या साहित्यसेवेचा ‘सकलमत सिद्धांत’ वंदनीय||
‘माणिकरत्न’ मासिकासह स्तोत्रं-ग्रंथ-पुस्तकं सुवाचनिय||८||
किती प्रेमाने अभिमानाने भक्त तुम्हास म्हणती श्रीजी प्रभु||
गुरुस्थानी तनुस तुम्ही जन्मदिनी स्विकारावे काव्यपुष्प हे विभु||९||
🙏Jai Guru Manik 🙏
Jai guru manik 🙏🌹🙏
bhavpurn arthpurn kavya! Jay Guru Manik!
भक्ती रसात एकरुप झाल्याशिवाय गुरु महिमा शब्दांकित करता येत नाही याचे हे उत्तम उदाहरण जय गुरु माणिक🙏
भक्ती रसाचा गोडवा अवर्णनीय सुंदर चित्रण जय गुरु माणिक🙏
श्रीजींच्या जीवनीचे समग्र वर्णन… जय गुरु माणिक…