श्रीसिद्धांच्या पूण्यप्रद श्रीमाणिकनगरीचे वंशज||
संत मिरेसम हरीभक्त श्रीहराचे प्रिय-आत्मज||१||
प्रतिभावंत बुद्धिवंत सखोल आभ्यासु चिकित्सक वृत्ती||
लेखन काव्य वक्तृत्वासह भाषांवर प्रभुत्वाची व्याप्ती||२||
निस्वार्थी सदाचारी आवड सामजिक सेवाभावाची||
भावनाप्रधान निष्काम चर्येवर मुद्रा बालभावाची||३||
प्रज्ञा-कला-गुणांचा मनोहर मिलाफ श्री ज्ञानराजजी||
माणिकरत्नशिरोमणी शोभे प्रभूंच्या किरीटामाजी||४||
निरुपणाने ज्यांच्या होई अज्ञानाचा सहज लय||
आचरण ठेवता तद्वत जिव बने सुबुद्ध ज्ञानमय||५||
प्रभावी भाषाशैलीने करवता बिकट-परमार्थाचा सुलभ प्रवास||
भक्तवर्ग तुमच्या सत्संगात साधतो भौतिक आत्मिक विकास||६||
खंबीर नेतृत्वाने तुमच्या मिळालं श्रीसंस्थानाला नवं रुप-चेहरा||
भक्तवत्सला नित्य अन्नदानासह सुविधायुक्त केलात यात्री निवारा||७||
तुमच्या साहित्यसेवेचा ‘सकलमत सिद्धांत’ वंदनीय||
‘माणिकरत्न’ मासिकासह स्तोत्रं-ग्रंथ-पुस्तकं सुवाचनिय||८||
किती प्रेमाने अभिमानाने भक्त तुम्हास म्हणती श्रीजी प्रभु||
गुरुस्थानी तनुस तुम्ही जन्मदिनी स्विकारावे काव्यपुष्प हे विभु||९||
????Jai Guru Manik ????
Jai guru manik ????????????
bhavpurn arthpurn kavya! Jay Guru Manik!
भक्ती रसात एकरुप झाल्याशिवाय गुरु महिमा शब्दांकित करता येत नाही याचे हे उत्तम उदाहरण जय गुरु माणिक????
भक्ती रसाचा गोडवा अवर्णनीय सुंदर चित्रण जय गुरु माणिक????
श्रीजींच्या जीवनीचे समग्र वर्णन… जय गुरु माणिक…