
का ग जिव्हे घेसी न तू प्रभुनाम,
कैवल्यदायी पूर्णकृपेचे जे धाम ॥
परनिदेंस जिव्हा सरसर सरसावी,
प्रभुनाम घेण्या बोबडी का वळावी ॥
व्यर्थ वादविवादा शब्द उच्चारावे,
परी प्रभुनाम घेण्या मौनची व्हावे ॥
गोडधोड ओरपण्या लपलप धावी,
प्रभुनाम घेण्या आत का वळावी ॥
करी बा विचार, जिव्हेचा साचार,
प्रभुनामाचा कर तू त्वरित संस्कार ॥
वळव जिव्हेसि तू, मधुर माणिक नामी,
एक माणिक नामच येईल, सदासर्वदा तुझ्या कामी॥
Recent Comments