आमचे श्री माणिकप्रभु संस्थानशी अतूट नाते आहे आणि ते जोडण्यास श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु महाराजांच्या सगरोळी दौऱ्याचे निमित्त घडले. माझे वडील श्री बापूराव सगरोळीकर त्या वेळी तरुण होते. श्री महाराजांनी सगरोळीहून माणिकनगरला परतताना उत्साही व होतकरू बापूस “माझ्या बरोबर माणिकनगरला येशील का?” असे विचारताच क्षणाचाही विचार न करता माझ्या वडिलांनी “हो, येतो महाराज” असे तत्परतेने उत्तर दिले. एकदा ते माणिकनगरला आले आणि माणिकनगरचेच झाले. श्रीजींनीच आपल्या देखरेखीखाली माझ्या वडिलांचे शिक्षण पूर्ण करविले, संस्कार घडविले, लग्न लावून संसार थाटून दिला व श्री संस्थानच्या कारभारात रुजू करून घेतले.
श्री सद्गुरु शंकर माणिकप्रभु महाराज पीठारूढ झाल्यावर बापूराव हे त्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख झाली. माझे व माझ्या बंधु-भगिनींचे जन्म माणिकनगरातच झाले व आम्ही प्रभुमंदिराच्या परिसरात खेळत-खेळतच मोठे झालो. जेव्हां आमच्या वडिलांचा हैदराबाद येथे सरकार-दरबारी चांगला जम बसला तेव्हां श्री शंकर माणिकप्रभूंची हैदराबादची सगळी कामे बापुराव यशस्वीरीत्या करतात अशी ख्याती झाली. माझ्या वडिलांनी आपले संपूर्ण जीवन श्रीप्रभूंच्या सेवेतच खर्च केले.
पुढे शामराव या नावाने माझी वाटचाल सुरू झाली. श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांच्या कारकीर्दीतही आमच्या घरण्याची प्रभुसेवा वृद्धिंगत होत राहिली. श्रीजींच्या आज्ञेवरून ई. स. १९६५ सालच्या दत्तजयंती पासून दरवर्शी उत्सवाच्या लेखा विभागाची सेवा माझ्याकडे आली. ही सेवा प्रभुकृपेने ५५ वर्षांपासून आजतागायत चालू आहे. श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांचीही आमच्या घराण्यावर विशेष कृपादृष्टी आहेच. श्री प्रभुकृपेने श्री संस्थानच्या तीन पीठाधीशांची (श्री शंकरप्रभु, श्री सिद्धराजप्रभु व श्रीज्ञानराजप्रभु) कारकीर्द पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. या काळात श्रीसंस्थानची होत असलेली सर्वतोमुखी अभिवृद्धि पाहून कै. श्री बाबासाहेब महाराजांचे स्वर्णिम स्वप्न साकार होत असल्या सारखे वाटते.
श्री प्रभूंच्या कृपाछत्राखालीच आमच्या परिवाराची आजही वाटचाल सुरु आहे. प्रभुशी ऋणानुबंध आहेत याची रोज अनुभूती मिळते. अशीच सेवा आमच्या घराण्याकडून निरंतर घडत राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना.
[social_warfare]
Jai guru Manik
श्री गुरु माणिक जय गुरू माणिक
जय गुरू माणिक,
श्री सदगुरु माणिकप्रभु महाराज की जय
Jay guru manik
Jai Guru Manik…!!! ????????????????
भाग्यवंत आहात. अशी जाणीव कायम राहणे हेही महत्वाचे. आपले मनस्वी अभिनंदन… जय गुरू माणिक
असीच सेवा चालू राहुदे हिच प्रभु चलती प्रार्थना करतो
दादा, तुमच्या उपासने मुळे मला कित्येकदा प्रभुतत्वाची प्रचिती आली. दोन वर्षांपूर्वी मला पित्ताशयात खडे होऊन पोट दुखीचा त्रास झाला होता. चार महिने मी द्रव आहारावर होते. मरणप्राय यातना होत होत्या. आमच्या फॅमिली डॉक्टर नि सर्जिकल केस आहे म्हणून नांदेड/औरंगाबाद ला मोठ्या दवाखान्यात ऍडमिट व्हायला सांगितले. आम्ही औरंगाबाद ला कमलनयन बजाज मध्ये गेलो. सिरीयस पेशंट म्हणून मला ताबडतोब ऍडमिट करून घेतले.सगळ्या टेस्ट झाल्या. स्वादुपिंडा च्या तोंडावरअत्यंत नाजूक भागावर एक खडा बसला आहे पहिल्यांदा त्याचे ऑपरेशन करू आणि मग दोन दिवसांनी मेजर ऑपरेशन करू असे डॉक्टर नि सांगितले. इकडे सगरोळीत दादांना यांनी फोनवर सगळं सांगितले. दादांना हे ऐकून धक्का बसला. त्यांचं मन हळवं झालं. माझी काळजी वाटून त्यांनी ज्ञानराज माणिकप्रभु महारांजाजवळ आपली चिंता व्यक्त केली. प्रभूंना नवस केला. आणि जप सुरू केला. इकडे माझं BP नॉर्मल नाही म्हणून ऑपरेशन ची वेळ पुढे ढकलली. मी ही मनात अखंड नामस्मरण चालू ठेवलं. ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे.कठीण आहे. नाजूक आहे. पुढे काय होईल याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाहीत अशी कल्पना आधीच देण्यात आली. मला ऑपरेशन theatre मध्ये नेण्यात आले. मी डोळे बंद करून नामस्मरण करीतच होते. तेवढ्यात डॉक्टर लोकांची कुजबुज सुरू झाली. स्वादुपिंडावर बसलेला खडा अचानक गायब झाला होता. शोधून शोधून तो कुठेही सापडला नाही. डॉक्टरांना हा दैवी चमत्कार वाटला. आधीच्या रिपोर्ट मध्ये खडा स्पष्ट दिसत होता. पण शेवटच्या रिपोर्ट मध्ये सगळं ब्लॅंक. मग तिथेच ताबडतोब मेजर operation करण्यात आले. एक मोठा धोका टळला. ही प्रभू तत्वाची प्रचिती दादांच्या सेवे मूळे मला मिळाली.
जय गुरू माणिक.
Jai Guru Manik
जय गुरु माणिक
श्री गुरू जय गुरू माणिक प्रभु ????????????????❤❤