
लाभले आम्हांस भाग्य भजतो प्रभु माणिकेश
जाहलो खरेच धन्य पुजतो प्रभु माणिकेश
कृष्ण, विष्णू, जगदंब, सांब, राम – माणिकेश
काशी, पुरी, गिरीनार, चार धाम – माणिकेश
नित्य अमुचे प्रात: अन् सांज स्मरण – माणिकेश
जप, अनुष्ठान, ध्यान अन् धारण – माणिकेश
बेसुरेसे सूर अमुचे भजन करत – माणिकेश
वाणी आणि लेखणीत स्तवन सतत – माणिकेश
वारसा पुढल्या पिढीस भक्तिभाव माणिकेश
स्थान अमुचे श्रद्धेचे एक ठाव माणिकेश
Very Graciously Constructed and Concise .
Jai Guru Manik