
शिष्यावरून ओळखावा
गुरू तो थोर
त्याचाच प्रतिबिंब मानावा
शिष्याने जाणावे
आपले मर्म, कर्म आणि धर्म
एकची ती गुरुसेवा
गुरू इच्छा
तीच आपली इच्छा
भेद न करावा शिष्याने
केलाची गुरू मग
चिंता नसावी
सोपवावा भार त्यावरी
समर्पणातूनच सर्वोत्तमाकडे
अनुभवासी येईल
गुरुकृपेने
परमात्मा मिलनाची वाटचाल
आहे अत्यंत आनंदमय
चैतन्य जागविती
सद्गुरू
Recent Comments