शनिवारी मी आणी पराग महाराजांना दादर रेल्वे स्टेशन वर सोडण्यासाठी जोशी डॉक्टरांच्या घरी गेलो होतो. जेवण करून महाराज 2.15 मिनिटांनी खाली उतरून गाडीत बसले. वाहिनीसाहेब देखील त्यांच्या बरोबर होत्या. वंदे भारत चे 4.17 संध्याकाळ चे बोर्डिंग टाइम होते. आम्ही श्रीजीं बरोबर गप्पा मारत निघालो. पाऊस थोडा पडला होता. ट्राफिक थोडा होता. आम्ही माहीम माटुंग्याला पोचलो आणि प्रचंड ट्राफिक सुरु झाला. 4 वाजता प्लाझा च्या पुलावर होतो दादर TT ला रेल्वे स्टेशनला बाहेर पोचलो तेव्हा
4.13 झाले होते. प्लॅटफॉर्म लाखो माणसानी भरला होता. मी आणी पराग  बॅगा उचलून निघालो वाहिनी साहेब थोडं हळू चालत होत्या त्यांना असल्या गर्दी ची सवय नव्हती. मारुती मंदिराच्या बाजूच्या ब्रिज वरून जायचं ठरलं कारण रेल्वे aap वर E1 डबा इंजिन पासून पहिला दाखवत होते. थोडा ब्रिज चढून गेल्यावर एक  अजागळ हमाल आला आणी त्याने मला सरळ विचारलं वंदे भारत ला जायचं आहे ना चला आणा ती बॅग आणी बॅग हिसकावून निघाला माझ्या आणी पराग च्या हातातील बॅग घेऊन पळत सुटला मी त्याच्या मागे धावत होतो.
आम्ही इंजिन जवळ जाण्यासाठी ब्रिजवर होतो तो आम्हाला opposite म्हणेज गार्ड एन्ड च्या ब्रिज ला घेऊन गेला. महाराज माझ्या मागे शिरीष प्लॅटफॉर्म कोणता म्हणून विचारत येत होते. मी हमालाला विचारलं आणी सांगितलं 10 no. हमाल मला म्हणाला E1 इंजिन च्या मागे नाही येणार मी नेतो तिकडे चला असे म्हणाला. मी aap वर विश्वास ठेऊन त्याला  ओरडत होतो. की तू काहीतरी घोटाळा करशील तर मी पैसे देणार नाही. मी हमालच्या मागे प्लॅटफॉर्म वर एका position ला आलो वर इंडिकेटर दाखवत तो मला म्हणाला वर बघा. वर 22225 गाडी no दाखवत होता. अर्ध्या मिनिटातइंडिकेटर बदलून E1 दाखवायला लागलं. माझ्या मागे महाराज गर्दीत वाट काढत पोचले. वाहिनी थोडं हळू आल्या पराग त्यांच्या मागे बरोबर येतच होता. हमालांनी मला 3 बोट दाखवून 300 रुपये मागितले मी त्याला देऊन मोकळे केल. आणी गाडी येऊन उभी राहिली.
सामान चढवून महाराजांना आणी वहिनींना नमस्कार करून बाहेर उतरलो. बाहेर आल्यावर डोक सुन्न झाले होत. कळत नव्हतं अफाट दादर च्या जन सागरात हमाल आम्हाला शोधतं आला कुठून? बॅगा हिसकावून चला वंदे भारत ला सांगून पैसे न ठरवता सुसाट सुटला माझ्या जीवाची घालमेल चालली होति सामान घेऊन पळाला तर गाडी चुकली तर. अनेक विचारांचा गोंधळ होता. महाराज मात्र शांत पणे गर्दी च्या हिशोबाने वाट काढत येत होते. मी परत येऊन कार मध्ये बसल्यावर फोन केला आणी न राहून प्रसंग सांगितला. ते म्हणाले श्री प्रभू च आले मदतीला. अश्या सुन्न अवस्थेत आम्ही बोरिवली गाठलं
[social_warfare]